Maharashtra Political Crisis News, Dada Bhuse Latest Marathi News Dada Bhuse
मुंबई/पुणे

एकनाथ शिंदेंसह दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभूराजे देसाई यांची मंत्रीपदं धोक्यात

सेनेकडून या बंडखोरांपैकी १६ आमदारांची आमदारकी रदद् करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांनी नोटिसा पाठवल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी करत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, अशी मागणी केली आहे. मात्र, आता शिवसेनेने देखील या आमदारांसह गटनेते एकनाथ शिंदे आणि शिवसेनेमधील (Shivsena) मंत्र्याच्या विरोधात कारवाईचं सत्र सुरु केलं आहे.

या आमदारांपैकी गटनेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) कृषीमंत्री दादा भुसे, मंत्री गुलाबराव पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांची मंत्रीपद आता अडचणीत आली आहेत. कारण उद्धव ठाकरे आता या मंत्र्यांविरोधत लवकरच निर्णय घेणार आहेत. शिवाय त्यांची मंत्रीपद काढून घेण्याचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान, सेनेकडून या बंडखोरांपैकी १६ आमदारांची आमदारकी रदद् करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांनी नोटिसा पाठवल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आता मंत्र्यांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यपाल कार्यालयाला यासंदर्भातील पत्र पाठवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

तर आज शरद पवार यांच्या मुंईतील निवास्थानी एक बैठक पार पडली यावेळी शिवसेना पक्ष कायदेशीर प्रक्रियेला कसं सामोर जाणार आणि ती प्रक्रिया कशी पार पाडत आहे याची माहिती अनिल देसाई आणि अनिल परब यांनी शरद पवाांना दिली आहे. तसंच ही बैठक पार पडल्यानंतर शरद पवार हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत त्यामुळे आता महाविकास आघाडीने सत्ता टीकविण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे या बंडखोरांची आमदारकी आणि मंत्रीपद धोक्यात आल्याचं बोललं जात आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hot Yoga: झटक्यात वजन कमी करण्यासाठी करा हॉट योगा, एका आठवड्यात वितळेल शरीराची चरबी

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा, या महिलांना ₹१५०० मिळालेच नाहीत; कारण काय?

Municipal Elections Voting Live updates : मुंबई, पुण्यासह २९ महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात

Mahapalika Election : ...तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती, प्राजक्ता माळीनं केलं आवाहन | Video

Mumbai : मकरसंक्रातीला मुंबईत आक्रीत घडलं, पाहुण्यांकडे गेलेल्या बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT