Eknath Shinde Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांना खूशखबर मिळणार? दिवाळी बोनस जाहीर होण्याची शक्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन विभागाची बैठक बोलावली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीआधी खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन विभागाची बैठक आज बोलावली आहे. या बैठकीत दिवाळी बोनस बाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. एसटीची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने जवळपास 2 हजार कोटी रुपयांची देणी बाकी आहेत. ही देणी कशी पूर्ण करता येतील यावर देखील चर्चा होणार आहे. (Latest Marathi News)

एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या काही वर्षापासून सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. मात्र आता दिवाळीला अवघे काही दिवस उरले असताना अद्यापही कर्मचाऱ्यांना याबाबतची घोषणा झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्याचं लक्ष आज पार पडणाऱ्या बैठकीकडे आहे.

एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांना गेल्या वर्षी अडीच हजार आणि पाच हजार अशी रक्कम सानुग्रह अनुदान स्वरुपात देण्यात आली होती.

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना 22 बोनस जाहीर झाला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनाही मोठा बोनस जाहीर आहे. त्यामुळे यंदा चांगला बोनस मिळेल अशी अपेक्षा एसटी कर्मचाऱ्यांना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT