Anand Paranjpe gets major responsibility before Shiv Sena Dussehra rally 2026 saam tv
मुंबई/पुणे

दसरा मेळाव्याआधी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; बड्या नेत्याच्या खांद्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Eknath Shinde Appoints Anand Paranjpe As Shiv Sena Spokesperson: दसरा मेळाव्याआधी एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय! माजी खासदार आनंद परांजपे यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातून शिवसेनेत प्रवेश केलेले माजी खासदार आनंद प्रकाश परांजपे यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आनंद परांजपे यांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या पक्षप्रवेशाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विरोध केल्याची चर्चा सूत्रांकडून समोर आली होती.

दरम्यान, शिवसेनेच्या पक्षांतर्गत निवडणुका होईपर्यंत आनंद परांजपे यांची प्रवक्तेपदी नियुक्ती कायम राहणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण यांचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. दसरा मेळाव्याच्या आधीच परांजपे यांच्याकडे प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आल्याने शिवसेनेच्या संघटनात्मक आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या नियुक्तीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आज गोरेगावमध्ये दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. या मेळाव्यातून एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे. राज्यात दुष्काळाचे सावट असताना शिंदे शेतकऱ्यांसाठी मोठी मदातब जाहीर करण्याची शक्यता आहे. तर शिंदेंनी सर्व कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आजच्या मेळाव्याकडे लागले आहे.

उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार फुटल्यानंतर हा पहिला मेळावा होत आहे. तर ठाकरेसेनेचा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची तोफ कोणावर धडाडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीएम किसानच्या २४व्या हप्त्याचे २,००० कधी जमा होणार?

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरे गटावर निलेश राणेंची टीका; दोन ठाकरे एकत्र आले तरी राजकीय फरक पडणार नाही

Health Tips : एकाच वेळी अतिप्रमाणात पाणी प्यायलं तर शरीरात नक्की काय घडतं? आरोग्यासाठी चांगलं की वाईट?

पुणे पोलिसांचा गुंडांना दणका! टोळीप्रमुखासह 10 सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Nashik Crime: कायद्याच्या बालेकिल्ल्यात खरातनंतर आणखी एका भोंदूचं कांड उघड, आजार बरा करतो सांगत अघोरी पूजा; नंतर महिलेसोबत...

SCROLL FOR NEXT