Ladki Bahin Yojana News  Saam tv
मुंबई/पुणे

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी दिली मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana News : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट हाती आलीये. एकनाथ शिंदे यांनी मासिक २१०० रुपयांच्या पैशांवर महत्वाची माहिती दिली आहे.

Vishal Gangurde

सचिन बनसोडे, साम टीव्ही

नगर : राज्यातील लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता लाभार्थी महिलांना १५०० ऐवजी २१०० रूपये कधी मिळणार अशी चर्चा सुरु झाली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं भाष्य केलं आहे.

एकनाथ शिंदे हे आज शनिवारी नगरच्या अकोले दौऱ्यावर आहेत. आदिवासी दिनाचं औचित्य साधत कार्यक्रमातील उपस्थितांना संबोधित केलं. लाडकी बहीण योजनेवर एकनाथ शिंदे म्हणाले, 'मी फक्त उपमुख्यमंत्रीच नाही तर शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे. कार्यकर्त्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची जबाबदारी माझी आहे. हा मालक आणि कामगाराचा पक्ष नाही. मी कालही कार्यकर्ता होतो. आजही कार्यकर्ता आहे. रक्षाबंधनाच्या लाडक्या बहिणींना शुभेच्छा'.

'लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आम्ही जे जे बोललो ते टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहे. सोन्याचा चमचा घेऊन आमचा जन्म झाला नाही. मात्र, महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवनात सोन्याचे दिवस आम्हाला आणायचे आहे. एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला, हे तुम्हाला बघवत नाही. रोज शिव्या देता? मी उठाव केला आणि टांगापलटी घोडे फरार, असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला.

'देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदावर आमची आदिवासी बहीण आहे. काँग्रेसच्या विरोधात उमेदवार देऊन अपमान केला. विधानसभा निवडणुकीत सरकार येणार म्हणून मंत्रिपद देखील वाटली. कोणाला जेलमध्ये टाकतो अस देखील बोलले. मात्र माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना जागा दाखवली. पदे येतात आणि जातात. मात्र, मला लाडका भाऊ म्हणून मिळालेली पदवी सर्वात मोठी आहे. लाडकी बहीण योजनेवर विरोधकांनी टीका केली. मात्र ही योजना किती अफवा पसरवत असेल, तरी बंद होणार नाही. कर्जमाफीबाबतही आम्ही निर्णय घेणार आहे. आम्ही दिलेले वचन निश्चित पाळणार. प्रिंटिंग मिस्टेक झाली, असं म्हणणार नाही, असे एकनाथ शिंदे पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मुंबईत शिंदे गटाला मोठा हादरा, बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Live News Update: नांदेड-लोहा माहामार्गावर कार पलटी होऊन दोघे जखमी

Chanakya Niti : तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी चाणक्यांचे हे विचार १००% ठरतील प्रेरणादायी

Shocking : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; नराधमांनी कृत्यानंतर कौर्याची सीमाच ओलांडली, शहरात खळबळ

Rasmalai Chocolate Recipe: गोड खाण्याची इच्छा झाली असेल तर, झटपट तयार करा टेस्टी रसमलाई चॉकलेट

SCROLL FOR NEXT