Pune Rave Party Saam Tv
मुंबई/पुणे

Rave Party : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, खडसेंच्या जावायाचा अल्कहोल रिपोर्ट समोर

Pranjal Khewalkar Latest News : पुणे खराडीतील रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर अटकेत. ससून रुग्णालय अहवालात दारूचे सेवन स्पष्ट.

Namdeo Kumbhar

  • प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात अटक.

  • पुणे पोलिसांनी सात जणांना अटक केली असून कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

  • ससून रुग्णालयातील वैद्यकीय अहवालानुसार, खेवलकर व इतर दोघांनी दारूचे सेवन केले होते.

  • पोलिसांचा तपास सुरू असून अधिक गुन्हेगारी माहिती बाहेर येण्याची शक्यता.

सागर आव्हाड, पुणे

Pune Rave Party : एकनाथ खडसेचे जावई प्रांजल खवलकर यांना पुण्यातील खराडी येथील रेव्ह पार्टी प्रकरणात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कोर्टाने खेवलकर यांच्यासह सात जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून या प्रकऱणाचा तपास करण्यात येत असल्याची माहिती कोर्टात दिली होती. खराडीमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींची ससून रूग्णालयात वैद्यकीय तपासणी कऱण्यात आली होती. त्यामध्ये दोन जणांनी दारूचे सेवन केल्याचं समोर आले. एकनाथ खडसे यांचे जावई प्राजंल खेवलकर यांनीही त्या रात्री दारू प्यायली होती हे ससून रूग्णालायतील अहवालातून स्पष्ट झाले आहे. पोलिसांचा तपास सुरू असून अधिक गुन्हेगारी माहिती बाहेर येण्याची शक्यता.

खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणाचा अहवाल ससून रुग्णालयाने पुणे पोलिसांना सुपूर्द केला आहे. 5 पुरुष आणि 2 महिलांना ताब्यात घेतल्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात आरोपींची वैद्यकीय तपासणी झाली. ससून रुग्णालयाच्या अहवालात सात पैकी दोन जणांनी अल्कोहोलचे सेवन केले असल्याचा अहवाल मिळाला आहे. खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी दारू प्यायलं हे स्पष्ट झालं आहे. ससून रुग्णालयाच्या प्राथमिक अहवालातून माहिती समोर आली आहे. ड्रग्सचे सेवन केलं होतं का नाही? हे एफएसएल अहवाल आल्यावर स्पष्ट होणार आहे. सर्व आरोपींचे रक्ताचे व लघवीचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत. चार ते सहा दिवसात फॉरेन्सिक लॅबमधून आरोपींनी अमली पदार्थांचे सेवन केले होते का याचा अहवाल मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur–Pune Highway : कोल्हापूर-पुणे महामार्ग टोलमुक्त होणार? जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली नोटीस, वाचा नेमकं प्रकरण काय?

iPhone 17 Delivery: खूशखबर! फक्त १० मिनिटांत iPhone 17 घरपोच, 'या' कंपनीने केली घोषणा

Mumbai : मुंबईकरांनो लक्ष द्या! प्रभादेवी पूल आज रात्रीपासून वाहतूकीसाठी बंद | VIDEO

Vastu Tips: घराच्या छतावर 'या' गोष्टी ठेवत असाल तर व्हाल कंगाल; आर्थिक समस्याही लागतील मागे

Government Bank Merged: मोठी बातमी! देशातील १२ सरकारी बँकांचे विलीनीकरण होणार; फक्त ४-५ बँकाच राहणार

SCROLL FOR NEXT