Eight to ten people killed a criminal on record in Pune Yerwada area Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात रक्तरंजित थरार, भररस्त्यात सराईत गुन्हेगाराची हत्या; येरवडा परिसरात खळबळ

Satish Daud

सचिन जाधव, साम टीव्ही

Pune Crime News

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात खुनांचे सत्र अजूनही थांबलेले नाही. बुधवारी रात्री पुण्यात पुन्हा रक्तरंजित थरार घडला. येरवडा परिसरातील वडगावशेरी सैनिकवाडी येथे आठ ते दहा जणांच्या टोळक्याने सराईत गुन्हेगाराची हत्या केली. बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घडली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांनी (Police) त्यांच्या शोधात वेगवेगळी पथके रवाना केली आहे. अभिषेक दत्तू राठोड (वय २२, रा. मते नगर, वडगाव शेरी ) असं हत्या झालेल्या गुन्हेगाराचं नाव आहे. अभिषेक हा चंदन नगर पोलीस स्टेशनच्या पूर्व रेकॉर्डवरील आरोपी होता.

त्याच्यावर खंडणी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल (Crime News) आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक हा काही दिवसांपूर्वी जामीनावर बाहेर आला होता. बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास तो वडगावशेरी सैनिकवाडी येथे आला होता. यावेळी आठ ते दहा जणांचं टोळकं आलं.

या टोळक्याने अभिषेवर लोखंडी रॉड हल्ला केला. तसेच त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. या घटनेत अभिषेकचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले. ही हत्या नेमकी कुणी आणि कोणत्या कारणामुळे केली, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.

तंबाखू न दिल्याच्या रागातून एकाची हत्या

पुणे रेल्वे स्टेशनजवळ भुयारी मार्गातून जाणाऱ्या एका व्यक्तीवर चाकूने पोटात वार केल्याची घटना घडली. तंबाखू न दिल्याच्या वादातून हा प्रकार घडला. सूरज परताने (वय ३८, रा. परभणी) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.या प्रकरणी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. त्यावरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT