Eid E Milad 2023 saam tv
मुंबई/पुणे

Eid E Milad 2023 : ईदनिमित्त शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा : मुस्लिम संघटनेची मागणी

गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 तारखेला ईद निमित्त मुस्लिम बांधव मिरवणूक काढणार आहेत.

Siddharth Latkar

- अभिजित देशमुख

Kalyan News : ईद-ए-मिलादच्या दिवशी सार्वजनिक सुटी द्यावी अशी मागणी मुस्लिम बांधवानी प्रशासनास केली आहे. त्याबाबतचे निवदेन मुस्लिम संस्थांच्या माध्यमातून तहसीलदारांसह जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. (Maharashtra News)

यंदा अनंत चतुर्दशी (anant chaturdashi) आणि ईद-ए-मिलाद (eid a milad) हे दोन्ही सण 28 सप्टेंबर या एकाच दिवशी आले आहेत. ईद-ए-मिलाद दिवशी मुस्लिम बांधवांकडून देखील मिरवणूक काढली जाते. दोन्ही सण एकत्र येत असल्याने मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने ईदची मिरवणूक अनंत चतुर्दशी दुसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय घेतला.

मुस्लिम बांधवांनी दाखवलेल्या समजूतदारपणामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण काहीसा कमी झाला आहे. मुस्लिम संघटना गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 तारखेला ईद निमित्त मिरवणूक काढणार आहेत.

त्यामुळे 29 तारखेला सार्वजनिक सुटी देण्यात यावी जेणेकर चाकरमानी मुस्लिम बांधवाना या मिरवणुकीत सहभागी होता येईल अशी मागणी संघटनांनी केली आहे. या मागणीचे निवेदन मुस्लिम संस्था तर्फे तहसीलदारांसह जिल्हाधिकाऱ्यांना देखील देण्यात आले आहे अशी माहिती शरफुद्दीन कर्ते (मजलीसे मुशा वेरीन मसाजिद व औकाफा कल्याण) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT