education minister deepak kesarkar Big decision no more regular transfers of Government school teachers Saam TV
मुंबई/पुणे

Teachers Transfer News: राज्यातील शिक्षकांच्या बदल्या बंद होणार; शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा, कारणही सांगितलं

Teachers Transfer Latest News: यापुढे सरकारी शाळेतील शिक्षकांच्या नियमित बदल्या होणार नाहीत, अशी घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Teachers Transfer Latest News: राज्यातील सरकारी शिक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. यापुढे सरकारी शाळेतील शिक्षकांच्या नियमित बदल्या होणार नाहीत. येत्या दोन दिवसांत याबाबतचा आदेश काढण्यात येईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.

तीन वर्षांनंतर शिक्षकाची बदली (Teachers Transfer) केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता सुधारणेत खंड पडतो, ही बाब विचारात घेऊनच हा निर्णय घेण्यात आल्याचं दीपक केसरकर यांनी माध्यमांना सांगितलं आहे. विशेष बाब अथवा पुरेसे कारण असेल तरच या निर्णयाला अपवाद केला जाईल, अशी माहिती सुद्धा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

शिक्षकांच्या योगदानामुळे शाळांची महती वाढते. शिक्षकांची बदली झाल्यास अनेक पालक मुलांना दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतात, असेही त्यांनी नमूद केले. शिक्षक भरतीसाठी यापूर्वी परीक्षा घेतलेल्या उमेदवारांच्या लवकरच नेमणुका केल्या जातील. त्याची तयारी पूर्ण झाली असून संच मान्यतेनंतर नेमणुका देण्यात येतील, असेही केसरकर (Deepak Kesarkar) यांनी स्पष्ट केले.

शालेय वयात मुलांचे व्यक्तिमत्व घडत असते. त्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. या वयात मुलांचे शिक्षकांशी नाते निर्माण झालेले असते. त्यामुळे शिक्षक त्यांची गुणवत्ता वाढवण्याचे मोलाचे काम करीत असतात. दर तीन वर्षांनी शिक्षकाची बदली झाली तर यात खंड पडू शकतो. त्यामुळे यापुढे नियमित बदल्या न करण्याच्या निर्णयापर्यंत शालेय शिक्षण (Education) खाते आले आहे, असे केसरकर यांनी सांगितले.

दरम्यान, शिक्षक भरतीसाठी यापूर्वी परीक्षा घेतलेल्या शिक्षकांच्या लवकरच नेमणुका करण्यात येतील. भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली असून संच मान्यतेनंतर त्यांना नेमणुका देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना युनिफॉर्मसोबतच आता शूज आणि मोजेही मोफत देणार असून याबाबतचा निर्णय लवकरच घेणार असल्याचेही केसरकर यांनी सांगित

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

SCROLL FOR NEXT