education minister Deepak Kesarkar big announcement 50 thousand teachers will be recruited in Maharashtra  Saam TV
मुंबई/पुणे

Teachers Recruitment: राज्यात लवकरच ५० हजार शिक्षक भरती होणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची मोठी घोषणा

Government Teachers Recruitment: शिक्षक भरतीची वाट पाहत असलेल्या भावी शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच ५० हजार शिक्षकांची भरती केली जाणार, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली.

साम टिव्ही ब्युरो

Teachers Recruitment 2023: शिक्षक भरतीची वाट पाहत असलेल्या भावी शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच ५० हजार शिक्षकांची भरती केली जाणार, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केली. पहिला टप्प्यात ३० हजार आणि दुसऱ्या भरतीत २० हजार शिक्षकांची पदे भरली जाणार, असंही ते म्हणाले.

औरंगाबाद हायकोर्टाने स्थगिती दिल्याने शिक्षक भरतीचं काम रखडलं होतं, आता हायकोर्टाने त्यांची स्थगिती उठवली आहे, त्यामुळे शिक्षक भरतीचे परिपत्रक (GR) आजच काढण्यात येणार आहे, असं मंत्री दीपक केसकरांनी सांगितलं आहे.

दरम्यान, ही शिक्षकभरती (Teachers Recruitment) दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती देखील मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात राज्यात २० हजार शिक्षकांची भरती होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

राज्यात शिक्षण व्यवस्थेचा दर्जा घसरल्यानंतर राज्यातील शिक्षकांची संख्या हे महत्त्वपूर्ण कारण देण्यात आलं होतं. अनेक शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नसल्याने त्यांच्यावर अधिकचा भार येत असल्याचं चित्र सध्या आहे. त्यामुळे राज्यात शिक्षक भरती होणं हे महत्वाचं मानलं जात आहे.

राज्यात शिंदे-फडणवीसांचं (Eknath Shinde Government) सरकार आल्यानंतर शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीच्या अनेक घोषणा करण्यात आल्या होत्या. नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षक भऱती करण्यात येईल असं देखील मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं होतं.

तसेच आधार वेरिफिकेशनचं काम झाल्यानंतर राज्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ताबडतोब भरती करण्यात येईल असं देखील त्यांनी म्हटलं होतं. मात्र, प्रत्यक्षात शिक्षक भरतीसाठी कोणतीही हालचाल होत नसल्याचं चित्र होतं. पण आता करण्यात आलेल्या घोषणेनंतर आता तरी या शिक्षक भरतीला वेग येईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजप आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष प्रताप अडसड यांची तांडा वस्तीत दिवाळी साजरी

सकाळ सकाळ मुंबईकरांचे हाल, फटाक्यामुळे रेल्वे सिग्नलला आग; पश्चिम रेल्वे ३५ मिनिटे उशिराने

आगीचे तांडव! मुंबई, ठाण्यासह राज्यभरात २५ हून अधिक ठिकाणी आगीच्या घटना; ठाण्यात रॉकेटवर बंदी, नवी मुंबईत प्रदूषण वाढले

Weather Update: थंडी आली रे! अखेर राज्यात थंडीची जोरदार चाहूल; निफाडचा पारा घसरला, तुमच्या भागात काय आहे स्थिती?

Monday Horoscope : पैसा येण्याचे मार्ग मोकळे! 5 राशींची चांदीच चांदी होणार; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT