Pune School News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune School News : पुण्यात शिक्षण विभागाची मोठी कारवाई; 29 बोगस शाळा बंद, विद्यार्थ्यांचे काय होणार?

Pune News: पुण्यात शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. शिक्षण विभागाने पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 49 शाळा अनधिकृत असल्याचं घोषित केलं आहे.

Saam TV News

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यातील पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुण्यात शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. शिक्षण विभागाने पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 49 शाळा अनधिकृत असल्याचं घोषित केलं आहे. त्यातील 29 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तर पुणे जिल्ह्यातील 10 शाळांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

अनधिकृत शाळांचा शोध घेण्यसाठी पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेने आणि प्रशाकीय अधिकारी आणि जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबवली होती. यातून आता 29 शाळा बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील असणाऱ्या शाळा यांचे सर्वेक्षण पुणे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्याकडून करण्यात आले. यामधून ज्या शाळा विनापरवाना आहेत आणि ज्या चुकीच्या पद्धतीने बांधल्या गेल्या आहेत, त्यामध्ये आता 29 शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

ज्या शाळा कारवाईला प्रतिसाद देत नाहीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी आज दिली. पुणे जिल्हा परिषदेकडून आत्तापर्यंत शहर आणि जिल्ह्यातील एकूण 49 शाळांवर कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यातील या शाळा आहेत अनधिकृत

  • ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूल

  • नारायणा ई टेक्नो स्कूल

  • दी गोल्डन इरा इंग्लिश मीडियम स्कूल, फ्लोरिंग फ्लोरा इंग्लिश मीडियम स्कू

  • ई. एम. एच. इंग्लिश मीडियम स्कूल, सी. टी. ई. एल. इंग्लिश मीडियम स्कूल

  • द टायगर इज इंटरनॅशनल स्कूल, मेरीगोल्ड इंटरनॅशनल स्कूल

  • शिव समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल, दारूल मदिनाह स्कूल

  • टीम्स तकवा इस्लामिक स्कूल ॲंड मक्तब

  • लीगसी हायस्कूल, इमॅन्युअल पब्लिक स्कूल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर स्कूल बसमध्ये बिघाड

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

SCROLL FOR NEXT