ED News Saam Tv
मुंबई/पुणे

ABG Shipyard Scam: ईडीकडून एबीजी शिपयार्ड लिमिटेडच्या संबंधित ठिकाणी धाडसत्र, 5 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त

ABG Shipyard Fraud Case: ईडीने एबीजी शिपयार्ड लिमिटेडच्या संबंधित मुंबईसह पुणे आणि दिल्लीतील एकूण ७ ठिकाणी सर्च ऑपरेशन केलं.

Vishal Gangurde

सचिन गाड, मुंबई

Mumbai Crime News:

ईडीने आज बुधवारी एबीजी शिपयार्ड लिमिटेडच्या संबंधित ठिकाणी धाडी टाकल्या. ईडीने एबीजी शिपयार्ड लिमिटेडच्या संबंधित मुंबईसह पुणे आणि दिल्लीतील एकूण ७ ठिकाणी सर्च ऑपरेशन केलं. ईडीकडून या धाडीत पाच कोटी रूपयांची मालमत्ता करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी एबीजी शिपयार्ड लिमिटेड प्रकरणी सर्च ऑपरेशन केलं. ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईसह पुणे आणि दिल्लीतील एकूण ७ ठिकाणी सर्च ऑपरेशन केलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ईडीकडून या कंपनीच्या संबंधित पाच कोटी रूपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडी अधिकाऱ्यांकडून या कारवाईत रोकडसहित परदेशी चलन आणि दागिने जप्त केले आहेत. तसेच गुन्ह्यांशी संबधित कागदपत्रे जप्त केल्याचा दावाही ईडीने केला आहे.

ईडीच्या कारवाईत ८५ लाखांची रोकड, ४५ लाखांची परकीय चलन, ८६ लाखांचे चांदीचे कॉइन तसेच २.८३ कोटी रुपयांचे सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.

एबीजी शीपयार्ड कंपनीवर आयसीआयसीआय बँकेची २२ हजार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आतापर्यंत २ हजार ७०० कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

ऋषि अग्रवाल एबीजी शिपयार्ड कंपनीचे अध्यक्ष आणि एमडी आहेत. ऋषि अग्रवाल यांच्यावर कंपनीच्या नावावर कर्ज घेतलं. मात्र, अग्रवाल यांनी या कर्जाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. सीबीआयच्या माहिती नुसार, त्यांनी २८ बँकांकडून २२ हजार ८४२ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT