मनी लाँड्रींगचा प्रकरणात ईडीने परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवला Saam Tv
मुंबई/पुणे

मनी लाँड्रींगचा प्रकरणात ईडीने परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवला

ईडीने परमबीर सिंग यांना 3 वेळा समन्स बजावले होते

सूरज सावंत

मुंबई - मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे जबाब नोंदवला आहे. १०० कोटी वसुली प्रकरणात परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.ईडीने परमबीर सिंग यांना 3 वेळा समन्स बजावले होते, त्यानंतर परमबीर सिंह शुक्रवारी ईडी कार्यालयात पोहोचले आणि त्यांचा जबाब नोंदवला. अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अटकेपूर्वी ईडीने अनिल देशमुख यांना पाच वेळा समन्स पाठवले होते. पण त्यांनी याला दाद दिली नव्हती. त्यानंतर देशमुख अखेर २ नोव्हेंबर रोजी ईडी समोर हजर झाले. त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी त्यांना अटक करण्यात आली.

दरम्यान, काल गोरेगाव कथित खंडणी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत आ परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल दाखल करण्यात आहे. गुन्हे शाखा युनिट 11 संबंधित कारवाई करत असून या आरोपपत्रात सचिन वाझे यांच्यासह आणखी काही नावांचा देखील समावेश आहे.

गोरेगाव खंडणी प्रकरणात आतापर्यंतएकूण 6 आरोपी आहेत. परमबीर सिंग, सचिन वाझे, रियाझ भाटी, विनय सिंग, अल्पेश आणि चिंटू अशी प्रमुख आरोपींची नवे आहेत. किला कोर्टात 1 हजार 895 पानांच दोषारोपपत्र जबाबासहित दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणातील दोघे अद्याप देखील फरार आहेत. त्यांच्या नावे अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन

Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

Monday Horoscope: गणरायाचे आगमन अन् 'या' ३ राशींचे नशीब चमकणार; धनलाभासोबत मिळेल मोठी खुशखबर!

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

SCROLL FOR NEXT