Ajit Pawar, ED News Saam TV
मुंबई/पुणे

राज्य सहकारी बँक घोटाळ्याची ईडीकडून चौकशी; अजित पवारांच्या अडचणीत वाढ?

राज्य सहकारी बँकेच्या कथित २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची ईडीकडून पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्य सहकारी बँकेच्या (State Cooperative Bank) कथित २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची ईडीकडून पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. या घोटाळ्याप्रकरणी मूळ तक्रारदाराने निषेध अर्जाद्वारे या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली आहे.

त्यामुळे आता या ही चौकशी नव्याने सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या घोटाळ्याप्रकरणी तक्रारदाराने उपस्थित केलेले मुद्दे आणि ED ने दाखल केलेल्या अहवालाच्या आधारे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने विशेष न्यायालयात दिली आहे.

पाहा व्हिडीओ -

या कथित घोटाळ्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि ७६ जणांविरोधात ठोस पुरावे नसल्याचे सांगून प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केला होता.

मात्र, या अहवालावर आता मूळ तक्रारदार सुरिंदर अरोरा (Surinder Arora) यांनी निषेध याचिका दाखल केल्यामुळे ED अहवालाच्या आधारे प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.

शिवाय तक्रादाराच्या याचिकेतील मुद्दे योग्य असल्याने या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला दिले होते. तर पवारांसह अन्य नेत्यांच्या विरोधात ठोस पुरावे नसल्याचा दावा करून पोलिसांनी हे प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल दाखल केला होता. त्यानंतर आता पुन्हा राज्य सहकारी बँक घोटाळ्याची ईडीकडून पुन्हा चौकशी सुरु करण्यात येत असल्यामुळे अजित पवार अडचणी वाढणार की काय याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाण्यातील कासारवडवलीच्या निर्माणाधीन इमारतीच्या परिसरात हाणामारी

Ladki Bahin Yojana: महिना संपायला उरले शेवटचे ३ दिवस! लाडक्या बहि‍णींना मार्च-एप्रिलचे ₹३००० कधी येणार? वाचा अपडेट

Shocking : मोडलेलं लग्न पुन्हा जुळवण्याचं दिलं वचन; नराधम महिलेच्या घरात शिरले, संधी साधून केलं हादरवणारं कृत्य

"जय महाराष्ट्र, मराठी माणूस थांबता कामा नये..."; Bigg Boss फेम अभिनेत्याची मोठी घोषणा

Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; झटपट हे काम कराच अन्यथा पगार मिळणार नाही

SCROLL FOR NEXT