anil deshmukh Saam Tv
मुंबई/पुणे

ED ची चार्जशिट दाखल; अनिल देशमुख मुख्य आरोपी, मुलांचीही नावे

मुंबईतील विविध बार आणि रेस्टॉरंटमधून ४.७० कोटी रुपये गोळा केल्याचा आरोप ईडीने केला आहे.

साम न्यूज नेटवर्क

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने मुंबईतील पीएमएलए न्यायालयात मनी लाँड्रिंग प्रकरणात दाखल केलेल्या ७ हजार पानांच्या पुरवणी आरोपपत्रात (7000 pages supplementary chargesheet) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांचे मुख्य संशयित आरोपी म्हणून नाव निश्चित केले आहे. याबराेबरच देशमुख यांच्या दाेन्ही मुलांची नावे आराेपपत्रात समाविष्ट आहेत.

अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्या प्रदिर्घ चाैकशीनंतर ईडीने (enforcement directorate) त्यांना एक नाेव्हेंबरला अटक केली. देशमुख हे सध्या मुंबईतील (mumbai) आर्थर रोड कारागृहात आहेत.

सीबीआयने २१ एप्रिलला देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवल्यानंतर ईडीने देशमुख यांच्याविरोधात चौकशी सुरू केली हाेती. महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना देशमुख यांनी तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यामार्फत मुंबईतील विविध बार आणि रेस्टॉरंटमधून ४.७० कोटी रुपये गोळा केल्याचा आरोप ईडीने केला आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : धुक्याने वेढलेले डोंगर अन् निसर्गाचे मनमोहक नजारे, पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट खारघरमधील 'हे' ठिकाण

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

SCROLL FOR NEXT