Anil Deshmukh Latest News Saam tv
मुंबई/पुणे

Anil Deshmuk: अनिल देशमुखांना उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनाविरोधात ईडीची सर्वोच्च न्यायालयात धाव

Anil Deshmukh Latest News : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला इडीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक, मुंबई

मुंबई: मनी लॉड्रींग प्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना जामीन मिळाला होता. या विरोधात सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने (ED) आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला इडीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. (Anil Deshmukh Latest News)

१०० कोटी वसूली प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना 4 ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला होता. देशमुख यांना १ लाख रुपयांच्या जातमुचलकीवर न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र, अनिल देशमुखांना सीबीआयच्या गुन्ह्यातून जामीन मिळाला नाही. त्यामुळे देशमुख अजूनही तुरुंगातच आहेत.

अनिल देशमुखांना मिळालेल्या जामीनाला ईडीने विरोध केला आहे, त्यामुळे ईडीने सर्वोच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केली आहे. अनिल देशमुखांना १०० कोटी वसूली प्रकरणात जामीन मिळाला. मात्र, सीबीआयच्या गुन्ह्यातून अद्याप जामीन मिळाला नाही. त्या गुन्ह्यात अनिल देशमुख अद्यापही कोठडीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेका रद्द, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT