Sanjay Raut  saam tv
मुंबई/पुणे

संजय राऊतांची ईडीने विनंती फेटाळली; 'या' दिवशी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मागील ईडीचा ससेमिरा थांबण्याचं नाव घेत नाही आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे.

सूरज सावंत

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मागील ईडीचा ससेमिरा थांबण्याचं नाव घेत नाही आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. २७ जुलै रोजी ईडीने (ED) चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी समन्स ईडीने बजावलं आहे. (ED Summons Sanjay Raut )

ईडीने संजय राऊत यांना १९ जुलै रोजी समन्स बजावत बुधवारी, १९ जुलै रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, संजय राऊत ईडी कार्यालयात चौकशीला हजर झाले नाहीत. राऊत हे दिल्लीत पावसाळी अधिवेशनासाठी उपस्थित असल्याने ईडी चौकशीला हजर राहिले नाहीत.

दरम्यान, राऊतांनी चौकशीसाठी ७ ऑगस्टपर्यंत वेळ मागितला होता. मात्र, ईडीने सदर विनंती फेटाळून लावली. त्यानंतर ईडीने संजय राऊतांना समन्स पाठवत २७ जुलै रोजी चौकशीला हजर राहण्यास सांगितलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीच्या मुंबई कार्यालयाने गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. संजय राऊतांची या घोटाळ्याप्रकरणी याआधी देखील चौकशी ईडीने केली आहे.

दरम्यान, काल मंगळवारी ईडीने (ED) संजय राऊत यांच्याशी संबंधित प्रकरणात सुजित पाटकर आणि स्वप्ना पाटकर यांची चौकशी केली. सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे व्यवसायिक मित्र आहेत. स्वप्ना पाटकर यांच्या नावाने संजय राऊत यांनी अलिबागमधील जमिनीची खरेदी केल्याचा आरोप आहे. तर जमिनीचे ४ प्लॉट हे स्वप्ना पाटकर यांच्या नावे आणि ४ प्लॉट राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावे खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे सुजित पाटकर आणि स्वप्ना पाटकर या दोघांची ईडी कार्यालयात काल चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता संजय राऊत यांना ईडीने २७ जुलै रोजी चौकशीसाठी बोलावलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT