Sharad Pawar On ED's Action Against Nawab Malik Saam Tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar: "नवाब मलिक जाहिरपणे सत्य बोलत असल्यानं ईडीची कारवाई"; पवारांकडून मलिकांची पाठराखण...

Sharad Pawar: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर टिका करत मलिकांची पाठराखण केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या घरी सक्तवसुली संचालनालयाने आज पहाटे साडेपाचच्या सुमारास छापा टाकला. यावेळी त्यांची दोन तास चौकशी केल्यानंतर ईडीने मलिकांना ताब्यात घेतलं आणि आता ईडी कार्यालयात त्यांची चौकशी सुरु आहे. दाऊद इब्राहिम मनी लॉंड्रींग प्रकरणी त्यांना ईडीने (ED) ताब्यात घेतल्याचं कळतंय. याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर टिका करत मलिकांची पाठराखण केली आहे. (ED action as Nawab Malik openly speaks the truth)

हे देखील पहा -

शरद पवार याबाबत म्हणाले की, सध्या ज्या पद्धतीने यंत्रणेचा गैरवापर केला जातो त्याचं हे उदाहरणआ आहे. आम्हाला खात्री होती की आज ना उद्या हे होणार आहे. नवाब मलिक (Nawab Malik) हे जाहीरपणे बोलतात त्यामुळे, काही ना काही प्रकरण काढून त्यांना त्रास देण्यात येईल. त्यांनी कशाची केस टाकली? ज्यावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील असाच आरोप झाला होता. लोकांना बदनाम करणं, त्रास देणं, सत्तेचा गैरवापर करणं आणि त्याचं मुख्य कारण की जे लोक भुमिका स्वच्छ मांडतात केंद्र सरकारच्या विरोधात आणि या एजन्सींच्या विरोधात बोलणाऱ्यांना त्रास दिला जातो असा आरोपही शरद पवारांनी केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabestes Control And Liver Detox Drink: कारले की कडुनिंब? कोणता रस लिव्हर, ब्लड शुगर आणि स्किनसाठी सर्वात बेस्ट?

Dhurandhar 2 Collection : 'धुरंधर २' ची यशस्वी घोडदौड, सलग तिसऱ्या सोमवारी छप्परफाड कमाई; वर्ल्डवाइड कलेक्शन 1,600 कोटींपार

दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए! महिलांचे लैंगिक शोषण कसे केले? खरात बाबाने सर्वच सांगितलं; SIT तपासातून धक्कादायक माहिती समोर

Accident News : अमरावतीत भीषण अपघात! भरधाव कारने दुचाकीला उडवलं, तिघांचा जागीच मृत्यू

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्याची घोषणा लवकरच; पगार कितीने वाढणार; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT