devendra Fadnavis  saam tv
मुंबई/पुणे

MP Bus Accident : बस अपघातानंतर बचावकार्य सुरू; फडणवीसांनी मानले CM शिवराजसिंह यांचे आभार

इंदूरहून पुण्याकडे येणारी बस नदीत कोसळली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सदर दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

साम टिव्ही ब्युरो

रुपाली बडवे

मुंबई : मध्य प्रदेशच्या धारमध्ये महाराष्ट्रातील बसला अपघात झाला आहे. इंदूरहून पुण्याकडे येणारी बस नदीत कोसळली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सदर दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. मध्य प्रदेश सरकारने तत्काळ सर्व प्रशासन पाठवून मदत सुरू केली, त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री शिवराजसिंह (Shivraj Singh Chouhan) यांचे आभार मानले आहेत. ( Devendra Fadnavis News In Marathi)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत फडणवीस पुढे म्हणाले, 'गिरीश महाजन यांना इंदूरला रवाना केलं आहे. सर्व व्यवस्था तातडीने उपलब्ध करण्यासाठी जळगावमध्येही सर्व व्यवस्था उभारण्यात आली असून नातेवाईक संपर्क करून माहिती घेऊ शकतात'.

राजकीय हस्तक्षेप करून निवडणुका पुढे ढकलण्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता, त्या आरोपांना देखील फडणवीसांनी उत्तर दिले. 'निवडणुकांबाबत त्यांचं पत्र मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी त्याबद्दल निर्णय घेऊ. यावेळी फडणवीसांनी काँग्रेसवर देखील निशाणा साधला. 'काँग्रेसच्या नेत्यांनी संविधानाबद्दल बोलायला नको. भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानाला श्रेष्ठ मानतात'.

दरम्यान, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी नागपुरात तर त्यानंतर रात्री दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार करायचा असून यावर आज दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT