Devendra Fadnavis news  saam tv
मुंबई/पुणे

उद्धव ठाकरे यांचे 'ते' वक्तव्य खालच्या दर्जाचं; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

अॅड. जयेश गावंडे

Devendra Fadnavis News : दसरा मेळाव्याला शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार राजकीय घमासान पाहायला मिळालं. शिवाजी पार्कवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि नातवावर देखील वक्तव्य केलं. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री तथा अकोला पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी फडणवीस बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'एकनाथ शिंदे यांच्या नातवाबद्दल उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका टिपण्णी ही खालच्या दर्जाची आहे. उद्धव ठाकरे यांनी आपले शब्द मागे घेतले पाहिजे. या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल देखील प्रतिक्रिया दिली आहे. स्क्रिप्ट लिहिण्याची फॅशन झाली आहे. पण प्रकाश आंबेडकर यांची स्क्रिप्ट कोण लिहितो हे पाहावे लागेल असेही फडणवीस म्हणाले.

जलयुक्त शिवार योजनेबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'जलयुक्त शिवार ही योजना आम्ही पुनर्जीवित करत आहे. गेल्या दोन अडीच वर्षात निर्णय झाले नसून आम्ही अविश्रांत काम करत असून शंभर दिवसात अनेक निर्णय घेतले आहेत'.

शरद पवार, नितीश कुमार यांच्या भेटीवर फडणवीस म्हणाले, 'गेल्या सात-आठ वर्षांपासून हे भेटत आहेत. पण कुठलेही समीकरण चालत नाही. मोदीजी हे मनामध्ये आहेत. मोदींजी मोठी रेषा ओढूनच यांच्यापुढे यांच्या पुढे जाता येते. त्यामुळे मात्र, मोदींजी पेक्षा मोठी रेषा ओढण्याची रेषा ओढण्याची शक्ती कोणामध्येच नाही'.

तर नागपूर येथे असलेल्या राष्ट्रीय सेवासंघाच्या मुख्यालयाला घेराव घालण्याचा जमावाचा प्रयत्न करण्यात आला, यावर फडणवीस म्हणाले, 'या आंदोलनावर मी बोलणार नाही. मात्र, या संदर्भात अनेक इनपूट आहेत. योग्य वेळ त्याचा खुलासा करेल, असे फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT