Devendra Fadnavis  Saam TV
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळाच्या विस्तारावर मोठं विधान; म्हणाले...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर 'फक्त वाट बघा' असं विधान केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Devendra Fadnavis News : राज्यात शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार, याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे. राज्यात अनेक भावी मंत्रीही मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार, याची वाट पाहत आहेत. याचदरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर 'फक्त वाट बघा' असं विधान केलं आहे. (Latest Marathi News)

मुंबईत आयोजित 'सकाळ' सन्मान सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुलाखत मुंबई सकाळचे संपादक राहुल गडपाले यांनी घेतली. यावेळी फडणवीसांनी राज्यातील विविध प्रकल्पांवर भाष्य केलं. विकासाच्या मुद्द्यांवरही चर्चा केली. शेवटी त्यांनी विस्ताराबाबतही एक भाष्य केलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्लीमध्ये याबाबत स्पष्ट सांगितलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, तुम्ही फक्त वाट बघा'.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाने आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, फडणवीसांनी 'वाट बघा' असं म्हटल्याने सभागृहातही हशा पिकला होता.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मुंबई शहर तीन वर्षामध्ये बदलेलं असेलं. त्याचं कारण मेट्रो आहे. मेट्रो-३ हा किलोमीटरच्या प्रकल्पामुळे १७ लाख प्रवाशी प्रवास करु शकतील.

मुंबई प्रदूषणमुक्त आणि ट्रॅफिकमुक्त करण्याची संकल्पना आम्ही सत्यामध्ये उतरवणार आहोत.वाढवण बंदरामुळे विकासाला चालना मिळेल, यात अजिबात शंका नाही.

कोकणाचा नाणार रिफायनरीमुळे विकास होईल. नाणार प्रकल्प लांबल्यामुळं नुकसान झालं. नाणार भारतातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. तब्बल ३ लाख कोटींची ही गुंतवणूक असल्याने रोजगाराला चालना मिळणार आहे.

प्रकल्प आला की त्याला विरोध करायचा, या प्रवृत्तीमुळे नुकसान होत आहे. मात्र आता ही रिफायनरी आम्ही पूर्ण करणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : वर्ल्डकपमधून विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ आऊट, श्रीलंका बाहेर; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

MSRTC: शिवशाही बस आता नव्या अवतारात येणार; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूदरात लक्षणीय घट; सरकारचे कोणते उपाय ठरताहेत गेम चेंजर?

खाण उपसंचालकावर व्हिजिलन्सची धाड, अधिकाऱ्याच्या घरात नोटांच्या थप्या

कर्जफेडीसाठी 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या, विरोधक आक्रमक, अधिवेशनात पडसाद

SCROLL FOR NEXT