Ajit pawar News Saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar News: बारामतीत आतापर्यंत काय काय केलं? भरसभेत अजित पवारांनी वाचला पाढा

Ajit Pawar Latest News in Marathi: नागरिकांना उत्तम सोईसुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. आगामी काळातही विविध विकासकामे कामे करावयाची आहेत. त्यामुळे त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

साम टिव्ही ब्युरो

Ajit Pawar Latest News:

'विविध विकासकामांच्या माध्यमातून बारामती तालुक्याच्या सर्वागिण विकास करुन नागरिकांना उत्तम सोईसुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. आगामी काळातही विविध विकासकामे कामे करावयाची आहेत. त्यामुळे त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. (Latest Marathi News)

बारामती येथे अर्जून प्रतिष्ठान आणि वस्ताद बाजीराव काळे तालिम दहिहंडी संघातर्फे गरजू विद्यार्थ्यांनीना सायकल, महिलांना शिलाई व साडी वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, ' बारामतीत आरोग्य सुविधा असलेले महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यात येत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि गरजू नागरिकांना घरे मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बारामतीच्या विकासाच्यादृष्टीने विविध दूरगामी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत'. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'या भागात मेडद येथील आयुर्वेदिक महाविद्यालय, नवीन बसस्थानक, परकाळे बंगला येथील कालवा सुशोभिकरण, चिल्ड्रन पार्क, श्रीमंत बाबुजी नाईक वाडा शुभोभिकरण, कऱ्हा नदी शुभोभिकरण, नवीन प्रशासकीय भवनाच्या शेजारी सेंट्रल पार्क, रस्ते बांधणी अशी विविध विकास कामे सुरु आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जुन्या भाजी मंडईचे गाळे पाडण्यात आले आहे.

तसेच 'तेथील गाळे धारकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. व्यापारी संकुल बांधण्यासाठी ६५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. भविष्यात गाळेधारक, ग्राहकांची सुरक्षितता, वाहनतळ आदी बाबीचा विचार करुन व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

'नागरिकांच्या सोईच्यादृष्टीने अत्याधुनिक स्मशानभूमी उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. आगामी काळात परिसरातील नागरिकांना सोई-सुविधा मिळण्यासाठी उद्यान, बगीचे, क्रीडांगण उभारण्यात येणार आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था मदत करीत आहेत. सार्वजनिक विकासकामे दर्जेदार, गतीने वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT