Ajit Pawar Pune  saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar: राष्ट्रवादी अजित पवारांचीच; निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Ajit Pawar Latest News: केंद्रीय निवडणूक आयागोच्या या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'निवडणूक आयोगाचा निकाल विनम्रपणाने स्वीकारत आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Vishal Gangurde

सुनील काळे, मुंबई

Ajit Pawar News:

केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गट हा खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयानंतर अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळणार आहे. केंद्रीय निवडणूक आयागोच्या या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'निवडणूक आयोगाचा निकाल विनम्रपणाने स्वीकारत आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने शरद पवार गटाला नवीन पक्ष आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. अजित पवार गटाच्या बाजूने निकाल लागल्याने त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा आनंद पाहायला मिळत आहे.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'निवडणूक आयोगाचा निकाल नम्रपणे स्विकारत आहोत. या निकालाने आमच्या समोरची जबाबदारी आणखी वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीची भूमिका पुढे वृध्दींगत करण्यासाठी आम्ही काल ही कटीबद्ध होतो, आजही आहोत आणि भविष्यातही राहू हा विश्वास जनतेला देतो. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाबाबत आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : नाशिकनंतर नागपूर हादरले! महिलेचं जबरदस्ती धर्मांतर करण्याचा प्रयत्न; नकार देताच विनयभंग अन् मारहाण, ६ जणांवर गुन्हा

Maharashtra News Live Update: पुण्यातील खराडी भागात आगीची घटना

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

SCROLL FOR NEXT