Mumbai crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Doctor Attack : मुंबईच्या सायन रुग्णालयात महिला डॉक्टरला मारहाण, शिवीगाळ; मद्यधुंद टोळक्यांकडून लाजीरवाणं कृत्य

Doctor Attack: कोलकातामधील महिला डॉक्टरवर अत्याचार आणि खून केल्यामुळे देशात संतपाची लाट आहे. त्यातच सायनमध्ये महिला डॉक्टराला मारहाण झाल्याची घटना समोर आली.

Namdeo Kumbhar

Mumbai Lady Doctor Attack: कोलकातामधील महिला डॉक्टरवर अत्याचार आणि खून केल्यामुळे देशात संतपाची लाट आहे. देशभरातली डॉक्टरांनी याचा निषेध नोदंवलाय. महाराष्ट्रातही याचे पडसाद दिसत आहेत. मुंबई, ठाण, पुणे आणि नाशिकसह राज्यातील अनेक ठिकाणी संप पुकारण्यात आला होता. हे सर्व देशात सुरु असतानाच मुंबईतील सायन येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. सायन रुग्णालयातील महिला डॉक्टरवर मद्य प्राशन केलेल्या पाच सहा जणांच्या टोळक्यांनी हल्ला केला. सायन पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी या प्रकऱणाचा तपास सुरु केला आहे.

सायन रुग्णालयातील महिला डॉक्टरला पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी रुग्णालयातच मारहाण केली. त्या तरुणांनी दारु प्यायलेली होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यामध्ये महिला डॉक्टर जखमी झाल्या आहेत. रविवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. महिला डॉक्टर ड्युटीवर असताना हा प्रकार घडलाय.

शिवीगाळ केली, त्यानंतर हल्ला केला -

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पाच ते सहा जण पहाटे एका व्यक्तीला घेऊन रुग्णालयात आले, त्या व्यक्तीच्या चेहऱ्याला जखम झालेली होती. त्या रुग्णावर उफचार करण्यात येत होते. त्याचवेळी एका व्यक्तीकडून महिला डॉक्टरला शिवीगाळ आणि धमक्या देण्यास सुरुवात केली. इतक्यावरच थांबले नाही, डॉक्टरवर हल्लाही केला. या हल्ल्यापासून वाचताना महिला डॉक्टर जखमी झाल्या.

महिला डॉक्टराकडून सायन पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे. पण महिला डॉक्टरावर झालेल्या हल्ल्यामुळे सायन रुग्णालयात संतापाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

Maharashtra News Live Update: पहिल्याच पावसात महाडच्या रस्त्यावर पाणी साचले

पोहण्याचा मोह जीवावर बेतला! नीरा- देवघर धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Omraje Nimbalkar: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ओमराजे निंबाळकर शिंदेसेनेत जाणार

Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, ५ मिनिटांच्या पावसात हिंजवडीतील रस्ते जलमय, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT