Lalit Patil arrested by Mumbai Police  Saam tv
मुंबई/पुणे

Lalit Patil Arrested: मोठी बातमी! ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला चेन्नईमधून अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

Lalit Patil arrested News: ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ललित पाटील याला ताब्यात घेतलं आहे.

Satish Daud

Lalit Patil arrested by Mumbai Police

गेल्या १५ दिवसांपासून फरार असलेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ललित पाटील याला ताब्यात घेतलं आहे. लवकरच त्याला महाराष्ट्रात आणलं जाणार असून कोर्टात हजर केलं जाणार आहे. २ ऑक्टोबर २०२३ रोजी ललित पाटील हा पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्याच्या शोधासाठी १० पथकं तयार करण्यात आली होती. (Latest Marathi News)

दरम्यान, ललित पाटील हा चेन्नई येथे लपून बसल्याची माहिती मुंबई पोलिसांना (Mumbai Police) मिळाली होती. माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने चेन्नई गाठून सापळा रचला आणि ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या. त्याला आता पुण्यात आणलं जाणार असून कोर्टात सादर करण्यात येणार आहे.

ललित पाटील हा पोलिसांच्या हाती लागल्याने ड्रग्सप्रकरणातील अनेक बड्या धेंडांची नावे बाहेर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आठवडाभरापूर्वी पोलिसांनी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याला अटक केली होती. तसेच त्याला तपासासाठी नाशिकला आणण्यात आले होते.

नाशिकच्या उपनगर परिसरात असलेल्या भूषण पाटील याच्या घरी पुणे पोलिसांनी (Pune Police) तपास केला. शिंदे गावात ज्या ठिकाणी कारवाई करण्यात आली, त्या ड्रग्स कारखान्यावर देखील भूषणला तपासासाठी नेण्यात आले होते. ही चौकशी पूर्ण करून पुणे पोलिसांचे पथक भूषण पाटीलला घेऊन रवाना झाले.

दरम्यान या तपासाप्रकरणी पुणे पोलिसांसह नाशिक पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. एक पोलीस आमच्या घरी आला होता. पोलीस आणि राजकारणी मिळून तुमच्या मुलाचा एन्काऊंटर करणार असल्याचं त्याने आम्हाला सांगितलं, असा आरोप ललित पाटील याच्या आईने केला होता.

पोलीस आमच्या घरी येऊन तपास करत आहेत. आमच्या घरी सोनं वगैरे काही सापडलं नाही. घरात फक्त माझं मंगळसूत्र आहे. सध्या ललित कुठे आहे हे आम्हाला माहीत नाही. एक-दोन वेळेस तो घरी आला होता. पोलीस ललितचा एन्काऊंटर करणार असल्याची आम्हाला भीती आहे, अशी प्रतिक्रिया ललितच्या आईने दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT