DRDO Pradeep Kurulkar Latest News Saam TV
मुंबई/पुणे

DRDO Pradeep Kurulkar Update : डॉ. प्रदीप कुरुलकरांचे महिलेसोबत विवाहबाह्य संबंध, दोषारोपत्रातून अनेक धक्कादायक गोष्टी उघड

Pune News : कुरुलकर यांच्या दोषारोपपत्रात अनेक धक्कादायक गोष्टी हळूहळू समोर येत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Pune News : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओच्या (DRDO) पुणेचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रदीप कुरुलकर यांचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्याची बाब समोर आली आहे. कुरुलकर यांच्या दोषारोपपत्रात अनेक धक्कादायक गोष्टी हळूहळू समोर येत आहेत.

डॉ. प्रदीप कुरुलकर यांचे ज्या महिलेशी विवाहबाह्य संबंध होते तिच्यासोबत केलेले व्हॉटसअप चॅटिंग एटीएसच्या हाती लागली आहे. मात्र या महिलेने अद्याप कोणतीही तक्रार केलेली नाही. संबंधित महिलेने तक्रार केल्यास कुरुलकर यांच्यावर आणि गुन्हे दाखल होऊ शकतात.

हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या कुरुलकर यांनी पाकिस्तानी एजंटला गोपनीय माहिती दिल्याची माहिती समोर आली होती. त्यातून त्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या त्यांना २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पाकिस्तानी हेरासोबत केलेले व्हॉट्सॲप चॅटमध्ये त्यांनी अनेक भारतीय संरक्षण दलाची अनेक संवेदनशील माहिती दिल्याचे समोर आलं आहे. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर झारा दासगुप्तासोबत अनेक अॅपच्या माध्यमातून चॅटिंग केल्याचं समोर आलं आहे.

चॅटिंगद्वारे कुरुलकर यांनी भारताच्या क्षेपणास्त्र मोहिमेची अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याचं स्पष्ट झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Damage : या ७ सवयी करतात तुमच्या किडनीचं नुकसान, आताच सोडा नाहीतर...

दिल्ली आंदोलनादरम्यान मोठी घडामोड! रुग्णालयात सोनम वांगचुक यांची 2 केंद्रीय मंत्र्यांसोबत 45 मिनिटे चर्चा; बैठकीत काय घडलं?

Maharashtra News Live Update: दिपक केसरकर यांनी बोलून दाखवली पुन्हा मंत्री होण्याची इच्छा

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, पोलिसांच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार; एक जवान शहीद

आमचा वेळ वाया घालवू नका; विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात दाखल याचिकेवर सरन्यायाधीशांची टिप्पणी

SCROLL FOR NEXT