Dr. Narendera Dabholkar Assanation case 
मुंबई/पुणे

Dr. Narendra Dabholkar Case: डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण; तब्बल १० वर्षांनी लागणार निकाल

Update on Dr. Narendra Dabholkar Case Verdict: डॉ. दाभोलकर यांच्या हत्या झाल्याच्या ८ वर्षांनी खून खटला सुरू झाला होता. खूनाचा तपास पूर्ण होऊन सप्टेंबर २०२१ मध्ये पुण्यातील विशेष न्यायालयाने ५ आरोपींविरोधात आरोप निश्चित केले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(सागर आव्हाड, पुणे)

Dr. Narendera Dabholkar Assanation case:

पुणे: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. डॉ. दाभोळकर यांच्या हत्येच्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून या खटल्याचा निकाल पुढील महिन्यातील १० तारखेला लागणार आहे.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्या झाल्याच्या ८ वर्षांनी खून खटला सुरू झाला होता. खुनाचा तपास पूर्ण होऊन सप्टेंबर २०२१ मध्ये पुण्यातील विशेष न्यायालयाने ५ आरोपींविरोधात आरोप निश्चित केलेत आणि खटल्याला सुरुवात झाली. जवळपास अडीच वर्षांपासून हा खटला चालू आहे.

पुण्यात झाली होती हत्या

डॉ. दाभोलकर यांचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ ला खून झाला होता. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. ते मॉर्निंग वॉकला जात असताना दोन जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. दाभोलकरांचा जागीच मृत्यू झाला.

नरेंद्र दाभोलकरांच्या मृत्यूनंतर राज्यभरात आंदोलनं झाली. सामाजिक चळवळीतील हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. या प्रकरणाचा तपास करण्यात पुणे पोलिसांना हवे तसे यश येत नव्हते. शेवटी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर दोन वर्षांनी सीबीआयने पहिल्या आरोपीला अटक केली.

१० जून २०१६ मध्ये पहिल्या आरोपीला अटक करण्यात आली होती. सीबीआयने अट केलेल्या व्यक्तीचा हिंदू जनजागृती समिती या संघटनेशी संबंध होता. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे असं या व्यक्तीचे नाव होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखचं सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT