मनसुख हिरेनच्या डायटम रिपोर्टबाबत संशय

 

SaamTV

मुंबई/पुणे

मनसुख हिरेनच्या डायटम रिपोर्टबाबत संशय; हत्येनंतरचं मनसुखला खाडीत फेकले

जर मनसुखची हत्या झाली आहे मग डायटम रिपोर्ट कसा काय पॉझिटिव्ह आला असा प्रश्न NIA ने उपस्थित केला आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुरज सावंत

मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयए (NIA) कडून या महिन्यात 5 जणांना अटक करण्यात आली आहे. यात सर्वात चर्चेतील नाव म्हणजे एन्काऊटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माचं, शर्मा आणि वाझे हेच या संपूर्ण कटाचे मुख्य सूञधार असल्याचे एनआयए ने कोर्टात सांगितले आहे. तसेच मनसुखची आधी हत्या केली व त्यानंतर त्याला खाडीत टाकल्याचेही न्यायालयात सांगितले. Doubts about Mansukh Hiren's Diatom report

हे देखील पहा -

हि जर वस्तुस्थिती असेल तर मग डायटम रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा आला हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. एनआयए कडून गुरूवारी मनसुख हिरेन आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणात प्रदीप शर्मा, मनीष सऩी व सतीष मोथकुरी उर्फ तन्नी याला अटक करण्यात आली आहे. एनआयएने दिलेल्या माहिती नुसार हत्येच्या राञी म्हणजेच 4 मार्चला सचिन वाजे आणि सुनील माने यांनी मनसुखला रा़हत्या घरून फोनकरून बोलावले होते.

मनसुख, वाजे आणि मानेसह घोडबंदर परिसरात गेला होता. त्यावेळी लाल कलरच्या चारचाकीत मनीष होता आणि तो सदर गाडी मनीषच चालवत होता. तर त्या ठिकाणी संतोष शेलार, आनंद जाधव, मनीष आणि सतीश हे उपस्थित होते. या चौघांनीच मनसुखची हत्या केली व त्यानंतर त्याला मुंब्रा खाडीत फेकून दिले.

मनसुखच्या घरातल्यांनी ही हत्या असल्याचे सांगून तपास यंञणेवर संशय व्यक्त करत मृतदेहाचा ताबा घेण्यास नकार दिला होता. मनसुखचे शवविच्छेदानाचे रेकाँर्डिग देखील करण्यात आले नव्हते. कालांतराने शवविच्छेदन अहवाल समोर आला. त्यात मनसुखचा बुडून मृत्यू झाल्याचं स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर खाञीसाठी डायटम चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

डायटम बोन रिपोर्ट म्हणजे काय?

वाहत्या पाण्यात डायटम नावाचा पदार्थ असतो. एखादी व्यक्ती पाण्यात बुडाल्यास त्याच्या शरीरात डायटम शिरतो. या व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीची डायटम टेस्ट पॉझिटिव्ह येते. पण मृतदेह पाण्यात फेकला गेल्यास त्याच्या शरीरात डायटमचा शिरकाव होत नाही. त्यामुळे त्याची डायटम टेस्ट निगेटिव्ह येते.

मनसुखचे शवविच्छेदन करते वेळी घटनास्थळी सचिन वाझे उपस्थित होता. वाझे त्यावेळी डॉक्टरांच्या थेट संपर्कात होता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात तपास अधिकारी आणि शवविच्छेदन अहवाल तयार करणाऱ्या तीन डॉक्टरांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शवविच्छेदन करणारे डॉक्टर हे NIA च्या रडारवर आले आहेत. जर मनसुखची हत्या झाली आहे मग डायटम रिपोर्ट कसा काय पॉझिटिव्ह आला असा प्रश्न NIA ने उपस्थित केला आहे. त्यामुळे लवकरच या तीन डॉक्टरांना NIA च्या चौकशीला सामोरे जाणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT