Pradeep Bhide
Pradeep Bhide Saam Tv
मुंबई/पुणे

बुलंद आवाज हरपला; ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सुप्रसिध्द वृत्तनिवेदक प्रदीप भिडे (Pradeep Bhide) यांचे आज निधन झाले. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दूरदर्शनमध्ये त्यांनी ४२ वर्ष त्यांनी वृत्तनिवेदन केले आहे. प्रदीर्घ आजाराने त्यांचे मुंबईत (Mumbai) निधन झाल्याची माहिती डीडी सह्याद्रीने ट्विटरवरुन दिली. बातम्या सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवाज यामुळे ते दूरदर्शनवरील बातम्यांची ओळख बनले होते.

प्रदीप भिडे यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. पदवीनंतर त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये 'जनसंपर्क अधिकारी' पदावर काम केले. पुढं १९७४ मध्ये त्यांनी मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये नोकरीला सुरुवात केली.

प्रदीप भिडे (Pradeep Bhide) यांना नाटकाचीही पार्श्वभूमी होती. त्यांनी ध्वनिमुद्रण क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. अनेक लघुपट, माहिती पट, जाहिरातींना त्यांनी आवाज दिला आहे. त्यांनी दीड ते दोन हजार कार्यक्रमांच सूत्रसंचालन केले आहे. त्यांना पुणे फेस्टीव्हलचा उत्कृष्ट निवेदक हा पुरस्कारही मिळाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna: 'नॅशनल क्रश' रश्मिकाच्या रुपाचं चांदणं पडलंय...

Nasim Khan News: 'थोडी हिंमत दाखवा आणि संधीचा फायदा घ्या!' MIMची खुली ऑफर नसीम खान स्वीकारणार?

Naseem Khan: काँग्रेसची भूमिका छळाची, ४८ पैकी एकाही जागेवर मुस्लिम उमेदवार नाही; नसीम खान कडाडले

Video: Taarak mehta ka ooltah chashmah मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत बेपत्ता झाल्यानं खळबळ!

Taiwan Earthquake News : ६.१ तीव्रतेच्या भूकंपाने तैवान पुन्हा हादरलं; नागरिकांमध्ये घबराट

SCROLL FOR NEXT