Raj Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

शिंदे, राणेंच्या बंडाशी माझी तुलना करु नका; राज ठाकरेंचा हल्लाबोल

शिंदे-राणेच्या बंडाशी माझ्या बंडाची तुलना करु नका, मी गद्दारी करुन, पाठीत खंजीर खूपसून बाहेर पडलो नाही - ठाकरे

Jagdish Patil

रुपाली बडवे -

मुंबई: शिंदे-राणेच्या बंडाशी माझ्या बंडाची तुलना करु नका, मी गद्दारी करुन पाठीत खंजीर खूपसून बाहेर पडलो नाही, तर बाळासाहेबांना सांगून मी पक्षातून बाहेर पडलो असल्याचं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ऍक्टिव्ह झाले असून त्यांनी आज दादर येथील रवींद्र नाट्य मंदिरात राज्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या तसंच पक्षवाढीसाठी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन केलं.

मेळाव्यातील भाषणामध्ये राज ठाकरे म्हणाले, 'मनसेने (MNS) एकही आंदोलन अर्धवट सोडलेलं नाही. मनसेच्या आंदोलनांमुळे अनेक टोलनाके बंद झाले, इतर पक्षांनी आश्वासन देऊनही टोल बंद केले नाहीत, मात्र ते मनसेने बंद केले. मशिदींवरील भोंग्याचं आंदोलन हातात घेतलं, तर ९२ ते ९३ ठिकाणचे सकाळी वाजणारे भोंगे बंद झाल्याचा आकडा पोलिसांनी (Police) दिला असल्याचं ते म्हणाले.

पाहा व्हिडीओ -

ते पुढे म्हणाले, राज्यात जे मागील अडीच वर्षापासून चालू आहे ते चांगलं नाही. २०१९ ला ज्यांनी मतदान केलं आहे त्यांना कळत पण नाहीये आपण कोणाला मतदान केलं. कोण कोणामधून बाहेर आलं हे कळतं नाहीये. हे राजकारण नसून तात्पुर्ती एडजस्टमेंट आहे.

तसंच छगन भुजबळ, नारायण राणे, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाची तुलना माझ्या बंडांशी करु नका, मी दगाफटका करुन, पाठीत खंजीर खूसपून नाही बाहेर पडलो नाही. मी बाहेर पडल्यावर दुसऱ्या पक्षात गेला नाही, तर तुमच्या विश्वासावर माझा नवा पक्ष उभा केला असंही राज म्हणाले.

राज यांनी सांगितला पक्ष सोडतानाची बाळासाहेबांची आठवण -

यावेळी राज यांनी शिवसेनेमधून बाहेर पडतानाचा एक किस्सा सांगितंला ते म्हणाले, 'बाळासाहेबांना (Balasaheb Thackeray) जेव्हा समजंल की, मी पक्षात राहणार नाही तेंव्हा, बाळासाहेबांनी मला बोलावलं. त्यावेळी मनोहर जोशी खोलीमधून बाहेर गेले. मी आणि बाळासाहेब दोघेच खोलीत होतो. बाळासाहेबांनी हात पसरले मला घट्ट मिठीत घेतलं आणि म्हणाले आता जा..

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Periods Tips: दिवसेंदिवस पाळी उशीरा येतेय? टेन्शन सोडा! हे नैसर्गिक उपाय एकदा करुन पाहाच

Crime News : जुन्या वादातून जीवघेणा हल्ला; पायावरून गाडी नेत लाथाबुक्क्यांनी मारहाण

Akshaya Naik: मराठमोळ्या अक्षया नाईकचा ओटीटी डेब्यू; या वेब सिरिजमध्ये साकारली खास भूमिका

Electric Shock : शेतातील मोटार सुरु करताना घडले दुर्दैवी; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

धक्कादायक! महिला डॉक्टरवर २ पोलिसांकडून बलात्कार, मृत्यूपूर्वी हातावर सुसाईड नोट लिहिली, सातारा हादरलं

SCROLL FOR NEXT