Dombivli News :  Google
मुंबई/पुणे

Dombivli News : ओआरएस द्यायला थोडासा वेळ लागला, ग्राहक संतापला; मेडिकल चालकाला केली बेदम मारहाण

Dombivli West News in Marathi :ओआरएस द्यायला थोडासा वेळ लागल्याने संतापलेल्या तरुणाने मेडिकल चालकाला मारहाण केल्याची घटना केली आहे. या प्रकरणी डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, कल्याण

डोंबिवली : डोंबिवलीत क्षुल्लक कारणावरून मारहाणीच्या घटना सुरुच आहेत. काही दिवसांपूर्वी रिक्षा चालकाने वाद घालत दुचाकीस्वाराला चक्क रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर ओआरएस द्यायला थोडासा वेळ लागल्याने संतापलेल्या तरुणाने मेडिकल चालकाला मारहाण केल्याची घटना केली आहे. या प्रकरणी डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओआरएस द्यायला वेळ लावल्याने संतापलेल्या ग्राहकाने मेडिकल चालकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिम परिसरात घडली आहे. या मारहाणीत मेडिकल चालक गंभीर जखमी झाला आहे. अशोक दुबे असं त्याचं नाव आहे. तर याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेला तक्रारीनुसार पोलिसांनी राजू धोत्रे या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

डोंबिवली पश्चिमेतील कोपर रोड परिसरात शास्त्रीनगर रुग्णालयाच्या समोर हंस मोडिकलचे दुकान आहे. अशोक दुबे हे या मेडिकल दुकान चालवितात. त्यांच्या दुकानात एक तरुण आला. अशोक दुबे हे त्यांच्या मोबाईलवर क्रिकेट मॅच पाहत होते. त्यावेळी लाईट गेली. समोर उभ्या असलेल्या ग्राहकाने ओआरएस द्यायला सांगितले. लाईट नसल्याने अशोक दुबे यांना ओआरएस द्यायला थोडासा वेळ लागला. त्यामुळे तरुण संतापला.

संतापलेल्या या तरुण ग्राहकाने मेडिकलमध्ये घुसून मेडिकलची तोडफोड केली. त्यानंतर चालक अशोक दुबे यांना मारहाण केली. दुबे यांच्या डोळ्याच्या खाली दुखापत झाली आहे. या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णूनगर पेलिसांनी मेडिकल चालकास मारहाण करणारा राजू धोत्रेला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मंदाकिनी खामकर यांची संधी हुकली!

PM Surya Ghar Yojana: सोलर पॅनेल, ३०० युनिटपर्यंत मोफत वीज अन् ७८००० रुपयांची सब्सिडी; सरकारची सूर्य घर योजना आहे तरी काय?

Gold Rate Today : २०२५ चा शेवट गोड! सोनं आणि चांदीचे दर घसरले, वाचा गोल्ड किती झालं स्वस्त

Dining Table Desing : नवीन किचनसाठी डायनिंग टेबलच्या शोधात आहात? मग जाणून घ्या ८ बेस्ट डायनिंग टेबल डिझाईन

Fish Fry: मासे कुरकुरीत फ्राय कसे करायचे? ही आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT