Dombivli Shocking saam tv
मुंबई/पुणे

Dombivli : प्रेमाचा दुर्दैवी शेवट! डोंबिवलीत २१ वर्षीय तरुणानं आयुष्य संपवलं, ११ व्या मजल्यावरुन मारली उडी

Dombivli News : डोंबिवलीत २१ वर्षीय तरुणाने इमारतीच्या ११ व्या मजल्यावरुन खाली उडी मारत आत्महत्या केली. त्याने प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

  • डोंबिवलीत २१ वर्षीय तरुणाने प्रेम प्रकरणातील वादानंतर इमारतीच्या ११ व्या मजल्यावरुन आत्महत्या केली.

  • अग्निशामक दल आणि पोलिसांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

  • विष्णूनगर पोलिस तपास करत आहेत, तरुणाने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे.

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Dombivli City : डोंबिवलीमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डोंबिवलीत एका २१ वर्षीय तरुणाने इमारतीच्या ११ व्या मजल्यावरुन उडी मारुन आयुष्य संपवले. सकाळी आठच्या सुमारास तो इमारतीच्या डकमध्ये बसून होता. प्रेम प्रकरणातून त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणाचा तपास विष्णूनगर पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीमध्ये काॅलेज तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. प्रेम प्रकरणाच्या वादानंतर इमारतीच्या ११ व्या मजल्यावरुन त्याने खाली उडी मारली. अग्निशामक दलाचे अधिकारी आणि पोलिसांनी या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

या प्रकरणाची माहिती डोंबिवली एसीपी सुहास हेमाडे यांनी दिली आहे. डोंबिवली सुदामा कॉम्प्लेक्समध्ये राहणार ऋषिकेश परब (२१ वर्षे) हा वंदे मातरम कॉलेजमध्ये शिकत होता. आज (२७ सप्टेंबर) सकाळपासून तो इमारतीत चिंतातुर अवस्थेत बसलेला होता. सकाळी ८ वाजल्यापासून ते १२ वाजेपर्यंत हा तरुण इमारतीत होता. त्यानंतर त्याने ११ व्या मजल्यावरुन फायर डकमधून उडी घेतली, असे सुहास हेमाडे यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच ११.४६ वाजता अग्निशमन दलाला फोन करण्यात आला. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले; तब्बल अर्धा तास अग्निशामक दलाचे अधिकारी पोलीस यंत्रणा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांच्या उपस्थितीतच दुपारी सुमारे १२ वाजता ऋषिकेशने उडी मारली.

प्राथमिक चौकशीत, प्रेम प्रकरणात आपल्या प्रेयसीसोबत झालेल्या वादाचा राग मनात धरून ऋषिकेशने आत्महत्येचा मार्ग निवडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.या धक्कादायक घटनेने डोंबिवली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विष्णूनगर पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेतून तरुणांच्या मानसिक तणावाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या अण्णामलाईंचं तिकीट कापलं? तामिळनाडू विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी आली समोर

Maharashtra Live News Update : अकोल्यात खळबळ! उच्चभ्रू वस्तीत सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय, पोलिसांनी केला पर्दाफाश

Mini Cylinder: गॅस सिलेंडर घेणं झालं सोपं! अ‍ॅड्रेस प्रूफची गरज नाही, परत केल्यावर मिळणार रिफंड

Congress: मोठी बातमी! बारामती, राहुरीची पोटनिवडणूक काँग्रेस लढणार, हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद चिघळला; लक्ष्मण हाकेंची सरकारी अधिकाऱ्याला धक्काबुक्की, VIDEO

SCROLL FOR NEXT