Divyang Mantralaya, CM Eknath Shinde SAAM TV
मुंबई/पुणे

Dombivli News: शिंदे सरकारची डोंबिवलीच्या पलावातील रहिवाशांना दिवाळी भेट; 26 हजार फ्लॅट धारकांना मालमत्ता करात मिळाली मोठी सूट

Dombivli News: डोंबिवली पूर्वेकडील पलावा येथील 25 हजार फ्लॅटधारकांना आयटीपी प्रकल्पात समाविष्ट करत मालमत्ता करात सूट देण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख

Dombivli News:

शिंदे सरकारने डोंबिवलीच्या पलावातील रहिवाशांना दिवाळी भेट दिली आहे. डोंबिवली पूर्वेकडील पलावा येथील २६ हजार फ्लॅटधारकांना आयटीपी प्रकल्पात समाविष्ट करत मालमत्ता करात सूट देण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. मंत्री रवींद्र चव्हाण , खासदार श्रीकांत शिंदे, पालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे सरकारच्या निर्णयामुळे २६ हजार फ्लॅट धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Latest Marathi News)

मनसे आमदार राजू पाटील यांनी शिंदे सरकारच्या या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली. 'पलावा आयटीपी प्रकल्पामधील नागरिकांच्या मालमत्ता करात 66 % टक्के सवलत देण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करत होतो. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र या नागरिकांनी मालमत्ता करापोटी भरलेली अधिकची रक्कम येत्या मालमत्ता कराच्या बिलातून कमी करण्यात यावी', अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डोंबिवली पूर्वेकडील पलावा हा एकात्मिक नगर वसाहत प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा कोणताही भार महापालिका प्रशासनावर येत नसतानाही येथील रहिवाशांकडून संपूर्ण कराची आकारणी केली जात होती. पलावामध्ये सुमारे २६ हजार फ्लॅट आहेत. हा आयटीपी प्रकल्प असून या प्रकल्पधारकांना नियमानुसार मालमत्ता करात ६६ टक्के सूट देण्यात यावी, अशी मागणी केली जात होती.

आज मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण , खासदार श्रीकांत शिंदे,पालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत या प्लॅटधारकांच्या मालमत्ता करात ६६ टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे २६ हजार कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी या निर्णयानंतर मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं आहे.

राजू पाटील यांनी काय मागणी केली होती?

महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडात २० नोव्हेम्बर २०१८ रोजी आयटीपी प्रकल्पामधील नागरिकांना मालमत्ता करात ६६ % सवलत देण्याचे परिपत्रक सरकारने काढले होते. मात्र या परिपत्रकाची अंमलबजावणी होत नव्हती. कारण तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे हे कार्यरत असताना त्यांनी खोणी पलावा येथील नागरिकांना मालमत्ता करात सवलत दिली होती.

दरम्यान, या संदर्भात महापालिकेचे या आधीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मात्र त्यांची निर्णय घेण्याआधीच बदली झाली. या संदर्भात आमदार राजू पाटील यांनी २० जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे सांगितले होते.

आयुक्तांनी या संदर्भात अहवाल सादर करण्यास दिरंगाई केली, तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जनहित मागणीचा आदर करीत नागरिकांना ६६ % मालमत्ता करात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. यानिर्णयासाठी आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केलं. तसेच नागरिकांनी जो अधिकचा कर भरला आहे, तो आगामी मालमत्ता करात समायोजित करण्यात यावा, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT