Dombivli News Saam TV
मुंबई/पुणे

Dombivli News: महावितरणचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर; विजेच्या झटक्याने ५ म्हशींचा तरफडून मृत्यू

Dombivli: वायर बाबत अनेकदा ग्रामस्थांनी महावितरणकडे तक्रार केली मात्र महावितरणने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.

Ruchika Jadhav

Electric Shock News:

महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा मोठी दुर्घटान घडली आहे. महावितरणच्या पोलवरील लटकलेल्या वायरचा स्पर्श झाल्याने ५ म्हशींचा मृत्यू झालाय. यात शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. ही घटना रविवारी सकाळी डोंबिवली पूर्व परिसरात घडली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेमंक काय घडल...?

डोंबिवली पूर्वेकडील भोपरगावात महावितरणच्या बोगस कारभारामुळे पाच म्हशींचा मृत्यू झालाय. भोपर गावातील गावदेवी मंदिराजवळ असलेल्या महावितरणच्या पोलवरील वायर लटकलेल्या अवस्थेत होत्या. या वायरबाबत अनेकदा ग्रामस्थांनी महावितरणकडे तक्रार केली मात्र महावितरणने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.

आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थ शिवाजी पाटील यांच्या पाच म्हशी या रस्त्यावरून जात होत्या. तेव्हाच या वायरीचा स्पर्श म्हशींना झाला, त्यामुळे या पाचही म्हशींना शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये महावितरण विरोधात संतापाचं वातावरण पसरलं आहे. ग्रामस्थांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे आतापर्यंत अशा बऱ्याच घटना समोर आल्यात. म्हशीं ऐवजी येथून एखादी व्यक्ती गेली असती आणि वायर त्या व्यक्तीला चिकटली असती तर त्याचाही जागीच मृ्त्यू झाला असता. डोबिंवलीत झालेल्या या घनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trimbakeshwar Jyotirlinga: हर हर महादेव! त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी

Crime News : पुणे हादरले! कपडे बदलताना फोटो काढून ब्लॅकमेल, १६ वर्षीय मुलीवर ५ वर्षे लैंगिक अत्याचार

Maharashtra Rain Live News: ठाणे जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील शाळांनाही सुट्टी

Airtel Prepaid: Airtel कडून यूजर्सना सरप्राईज ऑफर! एअरटेल प्रीपेड ग्राहकांना Apple Music मोफत उपलब्ध

Rain Update: मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी, हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT