Dombivli Police Saamtv
मुंबई/पुणे

Dombivli Crime News: संतापजनक! दुचाकीची कागदपत्रे मागितल्याने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; तरुण अटकेत

या प्रकरणी अवघ्या तासाभरात या मारहाण करणाऱ्या दुचाकीस्वाराला अटक केली आहे.

Gangappa Pujari

अभिजित देशमुख, प्रतिनिधी...

Dombivli Police News: विना नंबर प्लेटची गाडी थांबवून कागदपत्रांची विचारणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला दुचाकीस्वाराने शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

डोंबिवली पूर्व फडके रोड परिसरात काल रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. संतोष कांबळे असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव असून डोंबिवली रामनगर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे. (Dombivli Latest News)

याबाबत अधिक माहिती अशी की, डोंबिवली (Dombivali) पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवलदार रवींद्र कर्पे काल रात्रीच्या सुमारास डोंबिवली पूर्वेतील फडके रोड वर सहाकाऱ्यांसह गस्त घालत होते. याच दरम्यान त्यांना नंबर प्लेट नसणारी दुचाकी भरधाव वेगाने येताना दिसली. कर्पे यांना संशय आल्याने त्यांनी दुचाकी थांबवण्याचा प्रयत्न केला.

मात्र दुचाकीस्वार भरधाव वेगाने दूचाकी घेऊन गणपती मंदिराच्या दिशेने पळून गेला. त्यामुळे कर्पे यांना ही दुचाकी चोरीची असल्याचा संशय आला. त्यांनी दुचाकीस्वाराचा पाठलाग करत काही अंतरावर त्याला थांबवले व त्याच्याकडे कागदपत्रांची विचारणा केली. (Crime News)

यावेळी दुचाकीस्वाराने कर्पे यांच्याशी हुज्जत घातली तसेच त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली व तेथून पळून गेला. या प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी अवघ्या तासाभरात या मारहाण करणाऱ्या संतोष कांबळे या दुचाकी स्वाराला अटक केली आहे. संतोष कांबळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

LDL cholesterol: निरोगी व्यक्तीची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती? ही रेंज माहित आहे का?

Dark elbows causes: कोपर काळं पडतंय? धूळ-मळ समजून दुर्लक्ष करू नका, शरीरातील ‘या’ गंभीर समस्येचा असू शकतो संकेत

SCROLL FOR NEXT