Dombivli Crime Cctv Video Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli Crime News: हातगाडी लावण्यावरून वाद, महिलांना मारायला थेट सुपारीच दिली, CCTV VIDEO

Dombivli Crime Cctv Video: हातगाडी लावण्यावरून वाद, टोळक्याने केली महिलांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण; पाहा सीसीटीव्ही व्हिडिओ...

Satish Kengar

>> अभिजित देशमुख

Dombivli Crime Cctv Video:

डोंबिवली पूर्वेकडील टाटा नाका परिसरात हातगाडी लावणाऱ्या दोन महिलांना एका टोळक्याने लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण करणारे सर्व हल्लेखोर बुरखाधारी होते. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मानपाडा पोलिसांनी या आरोपींचा शोध सुरू केला.  (Latest Marathi News)

मात्र हल्लेखोर हे बुरखाधारी असल्याने त्यांचा चेहरा दिसून येत नव्हता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चार हल्लेखोरांना बेड्या ठोकल्यात आहेत. पोलीस तपासात या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झालाय. हातगाडी लावण्यावरून दोन महिलांना मारहाणीची सुपारी त्यांच्या शेजारी दुकान चालवनाऱ्या विशाल राठोड याने दिली होती. हातगाडी लागल्याने विशाल याला त्रास होत होता. त्यामुळे त्याने महिलांना मारण्यासाठी सुपारी दिली हाेती.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील टाटा नाका परिसरात देशमुख हाेमच्या बाजूला मोठ्या प्रमाणात फेरीवाले व्यवसाय करतात. या ठिकाणी अनेक प्रकारची दुकाने लावली जातात. याच परिसरात रोशनी सिंग आणि चांदणी सिंग या दोन्ही बहिणी हातगाडी लावतात. हातगाडी लावल्याने शेजारी दुकान चालविणारे विशाल राठोड याला नेहमी त्रास होत होता.

विशालच्या दुकानासमोर हातगाडी लागल्याने रोशनी आणि चांदणीचा नेहमीच वाद होत होता. काही दिवसापूर्वी या दोन्ही महिला हातगाडीजवळ उभ्या असताना काही तरुण त्यांच्या जवळ आले. त्यांनी तोंडावर बुरखा घातला होता. हंडग्लोज घातले होते. त्यांनी या दोन्ही महिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत या दोन्ही महिला बेशूद्ध झाल्या. त्यानंतर ते पळून गेले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

हल्लेखोर हे बुरखाधारी होते. त्यामुळे त्यांची ओळख पटत नव्हती. डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुऱ्हाडे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुरेश मदने, पोलिस अधिकारी सुनिल तारमळे, अविनाश वनवे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु झाला. अखेर या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी विशाल राठोड, मिलिंद नागवंशी, प्रविण जाधव, बाळा शेळके या चौघांना अटक केली. विशाल राठोड याने चांदणी आणि रोशनीला धडा शिकविण्यासाठी तिघांना सुपारी दिली होती. त्याच्या सांगण्यावरुन या तिघांनी त्या दोघींना बेदम मारहाण केली. या प्रकरणाचा मानपाडा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

SCROLL FOR NEXT