Dombivli Blast Case Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli Blast Case: डोंबिवली केमिकल कंपनी स्फोट प्रकरण, दोन्ही मालकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Kalyan Court:

Priya More

अभिजीत देशमुख, डोंबिवली

डोंबिवली एमआयडीसीतील (Dombivli MIDC) अमुदान केमिकल कंपनी स्फोट प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे. अमुदान कंपनीचे मालक मलय मेहता आणि स्नेहा मेहता यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कल्याण कोर्टामध्ये दोघांनाही हजर करण्यात आले होते. दोघांचीही पोलिस कोठडी संपल्यामुळे त्यांना आज कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अमुदान कंपनीचे मालक मलय मेहता आणि स्नेहा मेहता यांना कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायमूर्ती एस. एस राऊळ यांनी दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केली आहे. तपासात प्रगती नसल्याने पोलिसांना आरोपींची पोलिस कोठडी वाढवून देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. ठाणे क्राईम ब्रांचने मलय मेहता आणि स्नेहा मेहता यांची २ दिवसांची पोलिस कोठडी वाढवून मागितली होती. पण कोर्टाने पोलिस कोठडी वाढवून न देता दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

न्यायालयीन कोठडी मिळताच डोंबिवली केमिकल कंपनी स्फोट प्रकरणातील आरोपी स्नेहा मेहताने जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. कल्याण कोर्टानेमध्ये तिने जामिनासाठी अर्ज केला आहे. २ वर्षांचा एक लहान मुलगा आणि ८ वर्षांचा दुसरा मुल असल्याने जामीन द्यावी, अशी मागणी तिने याचिकेद्वारे कोर्टाकडे केली आहे. स्नेहाच्या जामीन अर्जावर उद्या कल्याण कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. स्नेहाच्या जामीन अर्जावर कोर्ट नेमका काय निर्णय देतोय हे उद्या समजेल.

दरम्यान, २३ मे रोजी डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान या केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला तर ६५ पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. या घटनेमुळे डोंबिवली हादरली होती. या स्फोटामुळे संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. कंपनीमध्ये काम करणाऱ्या अनेक कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. हा स्फोट झाला तेव्हा तीन ते चार किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला होता. अनेक इमारतींच्या काचा फुटल्या होत्या. या घटनेनंतर कंपनीच्या दोन्ही मालकांना एकाला ठाण्यातून तर दुसरीला नाशिकमधून अटक करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MLC Election : मोठी बातमी! पुण्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, सुनेत्रा पवारांनी या नेत्यावर दाखवला विश्वास

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

डायबिटीजमध्ये मसूर डाळ खावी का? रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'ही' डाळ आहे सर्वात बेस्ट!

Rule Change From Today: तुमच्या कामाची बातमी! UPI, LPG, पेट्रोलपर्यंत आजपासून या नियमांत बदल, पाहा A टू Z माहिती

Gold Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी खुशखबर, सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या ताजे दर

SCROLL FOR NEXT