Success Story Saam Tv
मुंबई/पुणे

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

Success Story: डोंबिवलीच्या अदिती सकपाळने अवकाश संशोधनात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिने १६ लघुग्रहांचा शोध घेतला असून, तीन संभाव्य लघुग्रहांची नासाने नोंद घेतली आहे.

Shruti Vilas Kadam

Success Story: जिद्द, चिकाटी आणि अविरत अभ्यासाच्या बळावर डोंबिवलीच्या अदिती प्रवीण सकपाळ या विद्यार्थिनीने अवकाश विज्ञान आणि अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. डोंबिवलीतील स. वा. जोशी ज्युनिअर कॉलेजमध्ये सध्या अकरावीत शिकणाऱ्या आणि टिळकनगर विद्यामंदिरची माजी विद्यार्थिनी असलेल्या अदितीने अत्यंत कमी वयात अंतराळात तब्बल १६ लघुग्रहांचा शोध लावला आहे. तिच्या या संशोधनाची दखल थेट अमेरिकेच्या नामांकित ‘नासा’ या अंतराळ संस्थेने घेतली असून, तिने शोधलेल्या ‘2024 WA95’, ‘2024 WQ39’ आणि ‘2024 FO7’ या तीन संभाव्य लघुग्रहांची नोंद नासाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पुणे येथील ‘स्पेसक्रॅट्स विद्यापीठ’ संस्थेमार्फत देशभरातील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांमधून घेतलेल्या चाचण्या आणि दहा हजार मुलाखतींच्या खडतर प्रक्रियेनंतर अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अदितीने अव्वल स्थान मिळवले. संस्थेचे संस्थापक डॉ. युवराज लांबोळे आणि स्पेस सायंटिस्ट प्रवीण वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत, ठाणे जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांपर्यंत मोफत अंतराळ संशोधन प्रशिक्षण पोहोचवण्यासाठी अदितीची ‘स्पेसक्रॅट ॲम्बेसेडर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तिच्यासोबत बदलापूरच्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी सोहम साळवे याचीही या पदावर निवड झाली आहे. सोहम हा वयाच्या नवव्या वर्षापासून अंतराळ संशोधनाचे धडे गिरवत असून सध्या तो आंतरराष्ट्रीय सायंटिस्ट प्रोग्राममध्ये कार्यरत आहे.

ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य स्पेस रिसर्चचे प्रशिक्षण पोहोचवण्यासाठी हे दोन विद्यार्थी ‘स्पेसक्रॅट्स‘चे संस्थापक डॉ. युवराज लांबोळे, स्पेस सायंटिस्ट प्रवीण वाकोडे आणि ठाणे जिल्हा इनोव्हेशन डायरेक्टर किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत.

जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि मंत्री आशिष शेलार यांनी केले कौतुक

या दोन्ही बालशास्त्रज्ञांच्या कौतुकास्पद यशाची दखल घेत ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ तसेच महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली. ठाणे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी देविदास पंडीत यांनीही या विद्यार्थ्यांची भेट घेऊन अभिनंदन केले. इयत्ता आठवीपासूनच रात्रीच्या आकाशातील ताऱ्यांचे वेध घेणाऱ्या अदितीची ही संशोधक वृत्ती आज फळाला आल्याची भावना तिचे वडील प्रवीण सकपाळ यांनी अभिमानाने व्यक्त केली असून, तिच्या या नेत्रदीपक यशाबद्दल डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्यातून सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

विरोधकांनंतर ज्ञानेश कुमारांविरोधात भाजपचे माजी मंत्रीही मैदानात; चोक्कलिंगम यांच्या पत्रानंतर कुमार आणखी अडचणीत

Mumbai News : मुंबई महापालिकेत खळबळ! दोन बड्या अधिकाऱ्यांचा मोठा गेम उघड, लाचखोरीचा गुन्हा

Pradeep Purnekar: ठाण्यात ठाकरेसेनेच्या विभाग प्रमुखावर कार्यालयातच गोळीबार; हत्येचा थरारक घटनाक्रम

रोहित शर्मा-शुभमन गिलचे तांडव! दोन्ही सलामीवीरांनी ठोकले वादळी शतक; विंडीजची पळता भुई थोडी

SCROLL FOR NEXT