Disha Salian Death Case Saam tv
मुंबई/पुणे

Disha Salian: दिशा सालियन मृत्यू प्रकरण: आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरेंनाही आरोपी करा, सतीश सालियन अन् वकील निलेश ओझांची मागणी

Disha Salian Death Case: दिशा सालियनचे वडील सतीश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम यांची भेट घेतली. अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडे त्यांनी आदित्य ठाकरेंविरुद्धात तक्रार केलीय.

Bharat Jadhav

दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी करणारी याचिका सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयातद दाखल केलीय. त्यानंतर पुन्हा एकदा दिशा सालियन प्रकरण पुन्हा चर्चेत आलं. दिशा सालियन मृत्यू प्रकरणामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सतीश सालियन यांनी आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेतली.

सतिश सालियन यांच्या वकिलांनी दिशाच्या मृत्यू प्रकरणातील आदित्य ठाकरे, सतिश वाझे, परमबीर सिंह, अभिनेता दिनू मोर्या यांच्यावर गंभीर आरोप केलेतय. सतीश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी मुंबईचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम यांची आज भेट घेतली. त्यांच्याकडे आदित्य ठाकरेंविरुद्धात तक्रार दाखल केलीय. आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरेंनाही आरोपी करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केलीय.

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत त्यांच्याकडे लेखी तक्रार केली. या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करून तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आलीय. दरम्यान, सतीश सालियन आणि वकीलांनी ही तक्रार केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी वकील निलेश ओझा यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले.

आम्ही आज मुंबईचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्याकडे तक्रार केलीय. आमच्याकडून सर्व प्रक्रिया पूर्ण झालीय. आता पुढची जबाबदारी पोलिसांची आहे. आता पोलीस आरोपींवर कधी कारवाई करतात हे पाहावं लागेल, असं वकील निलेश ओझा म्हणालेत. आज देण्यात आलेल्या तक्रारीत आधीचीच एफआयआर जोडण्यात आलीय. यामध्ये आदित्य ठाकरे, दिनू मोर्या, सूरज पंचोली, तसेच त्यांचे सुरक्षा रक्षक, परमबीर सिंह, सचिन वाझे, रिया चक्रावर्ती यांची नावे आहेत.

हे सर्व लोक आमच्या तक्रारीनुसार आरोपी आहेत. आधी आदित्य ठाकरे यांचं नाव आलं, तेव्हा परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेत वेगळीच स्टोरी सांगितली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केलेत. यात कोणताही राजकीय नेता त्या ठिकाणी आलेला नव्हता, असं सांगितलं. त्यामुळे परमबीर सिंह हे प्रकरण दडपण्यात सहभागी असल्याचा आरोपही वकील निलेश ओझा यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water : मुंबईकरांनो पाणी टंचाईची चिंता मिटली! महत्त्वाच्या ७ तलावांत ९३.८० टक्के पाणीसाठा

Maharashtra News Live Update: बदलापुरात भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

SCROLL FOR NEXT