मुंबई: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं आहे. ते 52 वर्षांचे होते. मुंबई-पुणे एक्सप्रेसवर हा अपघात झाला असून पहाटे 5:30 वाजता भातान बोगद्याजवळ ही घटना घडली. मेटे यांच्या गाडीने अनोळखी वाहनाला धडक दिली. मेटेंच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी विनायक मेटेंच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. "मराठा समाजाच्या मागण्यांसाठी नेहमीच आग्रही असणारे एक तडफदार नेतृत्व महाराष्ट्राने गमावले" अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. (Vinayak Mete Death News)
दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट केलं की, शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन धक्कादायक व दुःखद आहे. बीड जिल्ह्यातून राजकीय पार्श्वभूमी नसताना मेटे यांनी विविध आंदोलनातून आपले नेतृत्व सिद्ध केले. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी नेहमीच आग्रही असणारे एक तडफदार नेतृत्व महाराष्ट्राने गमावले. मेटे यांच्या कुटुंबीयांना या धक्क्यातून सावरण्याचे बळ मिळो ही प्रार्थना असं म्हणत त्यांनी विनायक मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे. तसेच अपघात झाला तेव्हा विनायक मेटे यांचा मुलगा गाडी चालवत असल्याचंही सांगितलं जातंय. अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी मात्र, उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. विनायक मेटे यांचा मुलगा देखील यावेळी त्यांच्यासोबत गाडीत असल्याने त्यालाही किरकोळ जखम झाल्याची माहिती आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.