Mahashivratri, dilip walse patil, bhimashankar
Mahashivratri, dilip walse patil, bhimashankar saam tv
मुंबई/पुणे

Mahashivratri 2023 : भिमाशंकर : देवाकडे मागून काही मिळत नसतं, वळसे पाटलांनी काेणाला काढला चिमटा

रोहिदास गाडगे

Mahashivratri 2023 : श्री क्षेत्र भिमाशंकरला (shri kshetra bhimashankar) आजपासुन महाशिवरात्री (mahashivratri) यात्रा उत्सव संपन्न होत आहे. सलग सुट्ट्या आणि शिवजन्मोत्सव (shi jayanti) असा एकत्र सोहळा असल्याने भिमाशंकरला रात्रीपासुनच भाविकांची (devotees) दर्शनासाठी रांगा लागली आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) आणि प्रशासकीय आधिकारी यांच्या उपस्थितीत मंदिरात (temple) शासकीय महापुजा संपन्न झाली.

महाशिवरात्री उत्सवानिमित्ताने भिमाशंकर मंदिर आणि शिंवलिंग गाभा-यात विविध रंगाच्या फुलमाळांनी सजावट करत मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यावेळी मंदिर परिसर रात्रीपासुनच उजाळुन निघाला आहे. तर दुसरीकडे शिवभक्तीचा जल्लोष होताना पहायला मिळत आहे. (Maharashtra News)

शासकीय पूजा झाल्यानंतर माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली. बळीराजावर आलेलं संकटाच्या मदतीसाठी देवाकडे काही मागुन मिळत नसतं. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने करावे असा टाेला माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी भाजपाला लगावला.

वळसे पाटील म्हणाले राज्यातील शेतक-यांवर संकटं आहेत पण ही संकटं नैसर्गिक कि मानव निर्मित आहे का हे पहावं लागेल. एकीकडं शेतीला वीज नाही, शेतमालाला बाजारभाव नाही अशा असंख्य संकटाचा सामना शेतकरी करतोय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दुर करण्याची जबाबदारी देवाची नाही तर सरकारची आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Lok Sabha 2024: नाशिक लोकसभेच्या जागेसाठी छगन भुजबळांचं दबावतंत्र? ओबीसींची ताकद दाखवण्यासाठी मोठी खेळी

Pune News: आईच्या कुशीत झोपलेलं ८ महिन्यांचं बाळ अज्ञाताने चोरलं; पुण्यातील धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

Sahil Khan : अभिनेता साहिल खान मुंबई पोलिसांच्या ताब्यात; महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मोठी कारवाई

Nandurbar Water Crisis: नंदुरबारमध्ये दुष्काळच्या झळा! एक हंडा पाण्यासाठी वणवण; महिलांना करावी लागतेय २-३ किमी पायपीट

Accident News: अज्ञात वाहनाच्या धडकेत २ तरुणांचा जागीच मृत्यू, हिंगोली रिसोड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

SCROLL FOR NEXT