Pandhari Sheth Phadke Saam Tv
मुंबई/पुणे

Pandhari Sheth Phadke: ज्या तारखेला गोळीबार केला, त्याच दिवशी पंढरीशेठ यांचं निधन झालं; वाचा गोल्डमॅनचा 'तो' किस्सा

Pandhari Sheth Phadke News: 'ज्या' दिवशी गोळीबार केला 'त्याच' दिवशी पंढरीशेठ यांचं निधन झालं, योगायोग म्हणावा, नियतीचा खेळ की अजून काही?

साम टिव्ही ब्युरो

>> सोनी मगर

Pandhari Sheth Phadke:

21 फेब्रुवारी 2024 ही तारीख पंढरीशेठ यांच्या आयुष्याची शेवटची तारीख ठरली. बैलगाडा प्रेमींसाठी हा जणू काळा दिवसच. पंढरीशेठ फडके आणि बैलगाडा शर्यत हे तर एक समीकरणच..! पनवेलध्ये ते बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेले होते. आपल्या आवडत्या स्थळीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंढरीशेठ आपल्या गाडीत बसले होते. तिथेच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. 21 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेताला.

'ज्या' दिवशी गोळीबार केला 'त्याच' दिवशी पंढरीशेठ यांचं निधन झालं, योगायोग म्हणावा, नियतीचा खेळ की अजून काही? आपल्या हटके स्टाईलने चर्चेत राहणाऱ्या पंढरीशेठ फडके यांच्या मृत्यूची तारीखही तितकीच महत्त्वाची. 21 फेब्रुवारी 2020 मध्ये नेमकं काय घडलं होतं? बरोबर चार वर्षांनी याच दिवशी त्यांचा मृत्यू व्हावा, ही गोष्ट नेमकं काय खुणावते? त्याचा अर्थ काय? यावरून आता बैलगाडा तसंच पंढरी शेठ यांच्या समर्थकांमध्ये चर्चा होत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बरोबर 4 वर्षांआधी याच दिवशी फडके यांनी केला होता गोळीबार

मिळालेल्या माहितीनुसार, 4 वर्षांआधी याच दिवशी पंढरीशेठ फडके यांनी गोळीबार केला होता, याच तारखेला पंढरीशेठ यांनी आपल्या गाडीत जीव सोडला. 21 फेब्रुवारी 2024 ही तारीख पंढरीशेठ यांच्या आयुष्याची शेवटची तारीख ठरली. बैलगाडा प्रेमींसाठी हा जणू काळा दिवसच. पंढरीशेठ फडके आणि बैलगाडा शर्यत हे तर एक समीकरणच..! पनवेलध्ये ते बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेले होते. आपल्या आवडत्या स्थळीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंढरीशेठ आपल्या गाडीत बसले होते आणि तिथेच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. यातच त्यांचा मृत्यू झाला. 21 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेताला.  (Latest Marathi News)

याच तारखेचा पंढरीशेठ फडके यांचा एक किस्सा सध्या चर्चेत आहे. स्थळ होतं, विहिघर मैदान. पंढरी शेठ फडके विहिघर वाला बिनजोड छकडेवाला हे गाणं सुरु झालं. आणि पंढरी शेठ फडके यांची मैदानात एंट्री झाली. एंट्री करताच त्यांनी हवेत गोळीबार सुरू केला. तब्बल हवेत 4 राऊंड फायर केले. समर्थकांनी फडकेंवर उधळणही केली. यावेळी फडकेंसोबत 40-50 समर्थक होते. त्यांच्या ताब्यातील ऑडी गाडी मैदानात पाठून येत होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. खारघर पोलिसांनी तात्काळ दखल घेतं फडकेंना ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. यावेळी फडके भाजपत सक्रिय होते.

पंढरीनाथ फडके हे पूर्वी शेकापचे नेते होते. मध्यतंरी त्यांच्यावर खुनाचा दाखल झाला होता. काही काळाने त्यांनी शेकाप सोडून भाजपत प्रवेश केला. पंढरीनाथ फडके हे बैलगाडा शर्यतीमुळे जेवढे चर्चेत होते, तेवढेच त्यांच्यावर असलेल्या आरोपांमुळेही चर्चेत होते. पनवेल परिसरात त्यांचा दबदबा होता.

गरजूंना पडेल ती मदत करण्यासाठीही ते ओळखले जायचे. बैलगाडा शर्यतीत जिंकलेला पैसा ते तिथल्या तिथे वाटायचे. त्यामुळे बैलगाडा प्रेमींमध्ये ते नेहमीच चर्चेत असायचे. आता त्यांच्या मृत्यूनंतर फडके यांच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसलाय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या या मृत्यूची तारीखही चार वर्षांनी त्यांनी केलेल्या गोळीबाराच्या तारखेशी जोडली गेलीय. याला नियतीचा खेळ म्हणावं की आणखी काही?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहेत रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

SCROLL FOR NEXT