Dhananjay Munde News  saam tv
मुंबई/पुणे

Dhananjay Munde : २ मुलांना जन्म दिला, एका घरात राहल्याशिवाय शक्य नाही; कोर्टाचा धनंजय मुंडेंना झटका

Dhananjay Munde News : कोर्टाने धनंजय मुंडे यांना मोठा झटका दिला आहे. सत्र न्यायालयाच्या निर्णयामुळे करुणा मुंडे यांना मोठा दिलासा दिला आहे.

Vishal Gangurde

सचिन गाड, साम टीव्ही

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मुंबई सत्र न्यायालयाने झटका दिला आहे. सत्र न्यायालयाच्या निर्णयावर चार आठवड्यांच्या स्थगितीची मागणी फेटाळली आहे. उच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान देण्यासाठी निर्णयावर स्थगितीची मागणी याचिकेतून केली होती. सत्र न्यायालयाने निर्णयाला स्थगिती देण्याची याचिका फेटाळल्याने धनंजय मुंडे यांना मोठा झटका बसला आहे. करुणा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध लग्नासारखेच असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.

वांद्रे कोर्टाने करुणा मुंडे यांना दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश आदेश दिले होते. पुढे वांद्रे कोर्टाचे आदेश सत्र न्यायालयानेही कायम ठेवले होते. त्यानंतर पोटगीच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी प्रयत्न सुरु केले. यासाठी धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला ४ आठवड्यांची स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेतून केली. मात्र, मुंडे यांची मागणी सत्र न्यायालयाने फेटाळून लावली.

धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना सत्र न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं. 'करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच आहे. दोघांनी २ मुलांना जन्म दिला आहे. हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, असं निरीक्षण सत्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावताना नोंदवलं.

करुणा मुंडे यांना २ लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलं होतं. आपल्या याचिकेत करुणा शर्मा यांच्याशी लग्न केलं नसल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला होता. धनंजय मुंडे आणि करुणा यांच्यातील संबंध हे वैवाहिक स्वरुपाचे आहेत. त्यामुळे करुणा या घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळण्यास पात्र आहेत, असं सत्र न्यायालयाने म्हटलं.

एका प्रसिद्ध नेत्याची जीवनशैली लक्षात घेऊन दंडाधिकाऱ्यांनी करुणा यांना अंतरिम देखभालीचा दिलेला आदेश योग्यच आहे. करुणा आणि त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शासकीय पडीक जमिनींबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना आदेश

पंतप्रधानपदासाठी खासदार फोडले, 2029च्या निवडणुकीसाठी अमित शाहांची तयारी

'ऑपरेशन टायगर' धोक्यात? एकनाथ शिंदेंची खेळी फसणार?

शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना, अमित शाहांनी ठाकरेंना डिवचलं

पवनराजेंना कुणी मारलं? पवनराजे हत्याकांडातील सर्व आरोपी निर्दोष

SCROLL FOR NEXT