Amruta Fadnavis On Devendra Fadnavis And CM Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

मध्यरात्री वेशांतर करुन ते शिंदेंना भेटायचे; अमृता फडणवीसांनी मोठी गुपितं केली उघड

Political Crisis In Maharashtra : अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे की, "देवेंद्र रात्री कपडे बदलून डोळ्याला मोठा गॉगल एकनाथ शिंदे यांना भेटायला जायचे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेले भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी त्यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाची बंडखोरी आणि मविआ सरकारवरील संकटादरम्यान देवेंद्र फडणवीस शांतपणे कसे सक्रिय होते याबतची गुपितं अमृता फडणवीसांनी उघड केली आहेत. (Amruta Fadnavis Latest News)

हे देखील पाहा -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सांगितलं की, देवेंद्र हे अनेकदा रात्रीचा पोशाख बदलून निघून जायचे आणि अनेकवेळा ते अशा पोशाखात दिसले की मी त्यांना ओळखूही शकले नाही, असा अमृता फडणवीसांनी केला आहे. अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे की, "देवेंद्र रात्री कपडे बदलून एकनाथ शिंदे यांना भेटायला जायचे. ते वेगवेगळे कपडे आणि डोळ्यांवर मोठा गॉगल लावून घरातून निघायचे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या भाषणात असे म्हटले होते. विधानसभा म्हणजे सत्तासंघर्षाच्या काळात सर्व आमदार झोपलेले असताना ते देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जायचे.

आता त्याही पुढे जाऊन अमृता फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. अमृता फडणवीसांनी असेही सांगितले आहे की, "देवेंद्र सहसा रात्री उशिरापर्यंत काम करतात.'' दरम्यान, ते जॅकेट घालून घराबाहेर पडत असत. चष्मा वगैरे घालत असत. कधी कधी मीही त्यांना ओळखले नाही. पण मला इतकं माहीत होतं की, काहीतरी मोठे घडत होते. अमृता फडणवीस म्हणाल्या, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण आम्ही सर्वांनी ऐकले. यावरून आमदारांमध्ये किती अस्वस्थता होती, हे दिसून येते.'' अशा स्थितीत कुठेतरी ती अस्वस्थता पसरणार होती आणि त्याचा परिणाम शिवसेनेचे विघटन आणि उद्धव ठाकरे सरकार कोसळल्याच्या रूपाने दिसून आलं आहे.

फडणवीस नाराज असल्याच्या चर्चांना उधाण

एकनाथ शिंदे हे बंडखोर शिवसैनिक, तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपचे प्रमुख नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आहे. यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्यात तुलना केली असता फडणवीस हे शिंदेंपेक्षा सिनिअर नेते ठरतात. असं असतानाही फडणवीसांना डावलत शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्यात आलं. केंद्रीय भाजपच्या याच खेळीमुळे फडणवीस नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आंल आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sillod Assembly Election: भाजप आणि उद्धवसेनेचे सूर जुळले; ठाकरेंनीच दिली हाक

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्धार; जयंत पाटील यांचा मोठा दावा

Chanakya Niti: या 3 सवयी असणाऱ्या व्यक्तीपासून कायम दूर राहा, आयुष्यात होईल पश्चात्ताप

Sillod News : सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

SCROLL FOR NEXT