Devendra fadnavis  Saam tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis : मंत्री माणिकराव कोकाटे यांनी खुलासा केलाय, पण...; रमी प्रकरणावर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis on manikrao kokate : रमी प्रकरणावर CM देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं आहे. त्यांच्याकडून झालेला प्रकार चुकीचं असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

Vishal Gangurde

मुंबई : मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधीमंडळातील सभागृहात ऑनलाइन रमी खेळण्यावरून नवा वादंग निर्माण झाला आहे. मंत्री कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. विरोधकांच्या टीकेनंतर आता मुख्यमंत्र्यांनीही झालेला प्रकार चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. अतिशय चुकीचं आहे. आम्हाला ते भुषणावह नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

विरोधकांच्या मागणीमुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत भर पडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा मागणी केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अतिशय चुकीचं आहे. आपलं कामकाज नसलं तरी, आपण गांभीर्याने बसलं पाहिजे. साधारणपणे होतं की, तुम्ही कागदपत्रे वाचता. इतर काही वाचता. पण रमी खेळतानाचा व्हिडिओ योग्य नाही. अर्थात त्यांनी खुलासा केला आहे. अचानक एक जाहिरात पॉपअप झाली. जरी त्यांनी एकूण सांगितलं असलं तरी, आम्हाला ते भुषणावह नाही'.

हनी ट्रॅप प्रकरणावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'प्रफुल्ल लोढा याचे सर्वांसोबत फोटो आहेत. त्याचे शरद पवार यांच्यासोबत देखील फोटो आहेत. सर्वांसोबतच फोटो आहेत. आजच्या परिस्थितीत कोणतेही पुरावे द्यायचे नाहीत. नुसतं हवेत बोलत राहायचं. माझी माध्यमांना विनंती आहे की, तुम्ही विरोधकांकडे पुरावे मागा. पुरावे न देता वायफळ बोलत राहायचं. या वायफळ चर्चांना उत्तर द्यायला मला वेळ नाही. मी विरोधीपक्षात असताना माझा एकही आरोप खोटा ठरला नाही. याला विरोधीपक्ष म्हणतात'.

मुंबई साखळी स्फोट प्रकरणावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. 'मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला आहे. तो निर्णय आमच्यासाठी धक्कादायक आहे. या निर्णयाच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: MPSC विरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार; राहुरी तहसील कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा

पुण्यातील १२ दिवसांचा दारूबंदी आदेश रद्द; आता फक्त याच दिवशी ड्राय डे, हायकोर्टानंही कडक शब्दांत ओढले ताशेरे

Curly Hair Care Tips: कर्ली केस फ्रिझी होऊ नयेत म्हणून करा 'या' ७ गोष्टी; कर्ल्स दिसतील परफेक्ट आणि सुंदर

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची लॉटरी! १८ हजारांचा बेसिक पगार थेट ६९ हजार रुपये होणार? बेसिक सॅलरीचे 'हे' गणित पाहाच

PF Withdrawal Rule: आपत्कालीन परिस्थितीत PF मधून किती पैसे काढता येतात? जाणून घ्या 9 नविन नियम

SCROLL FOR NEXT