Devendra Fadnavis/ Pankaja Munde Saam TV
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis on Pankaja Munde : पंकजा मुंडे 2 महिने ब्रेक घेणार, नाराजी असल्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Political News : वरिष्ठ नेते त्यांच्याशी संवाद साधतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : भाजप नेत्या पंकजा मुंडे पक्षाच्या नाराज असल्याच्या चर्चांवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. पंकजा ताई आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढू. त्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्या असल्याने त्यांच्याशी वरिष्ठ नेते चर्चा करतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

पंकजा मुंडे आमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांनी जाहीर केलं आहे की त्या दोन महिने सुट्टी घेणार आहेत. आम्ही त्यांच्याशी संवाध नक्की साधू. त्यांच्या मनात काय आहे जाणून घेऊ. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्यासोबत आला आहे. भाजपमधील काही नेत्यांचा त्यांच्याशी संघर्ष होता.

सगळ्यांना ते एकदम रुचेल किंवा पटेल हे आम्हीही आणि आमच्यासोबत आलेलेही समजत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीतीत संवादातून मार्ग निघत असतो. पंकजाताई आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे वरिष्ठ नेते त्यांच्याशी संवाद साधतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. (Political News)

पक्षासाठी काम करत राहतील

त्यांच्या मनात काही असेल तर पक्षाकडून नक्की समजून घेतलं जाईल. त्या पक्षासाठी काम करत राहतील. चांगल्या पद्धतीने त्या नेतृत्वही करत राहतील, अशा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

फडणवीसांनी त्यांना सोडलं तर समजायचं त्यांचाच हात आहे! व्हायरल ऑडिओ क्लिपवरून जरांगे पाटलांचा थेट इशारा

Dry Fruits Buying Tips: मिठाईऐवजी ड्रायफ्रूट्स आवडीने खाताय? थांबा, बाजारात आला बनावट सुकामेवा, असं ओळखा खरं काजू-बदाम

Car paint protection: कारचा रंग आणि चमक टिकवायचीये? या 7 टीप्सने गाडी वाटेल नवी कोरी

NCP Merger : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळांचे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठे विधान, अर्थ खात्यावर स्पष्ट बोलले

SCROLL FOR NEXT