Devendra Fadnavis On Barsu Protest Saam TV
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis On Barsu Protest: बारसूतील आंदोलकांना बंगळुरूतून फंडिंग, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

Satish Daud

Devendra Fadnavis on Barsu Protest: कोकणात होऊ घातलेल्या बारसू रिफायनरीला स्थानिकांनी जोरदार विरोध केला होता. याच रिफानरीवरून विरोधकांनी सरकारविरोधात आंदोलन करत रान उठवलं होतं. आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारसू आंदोलनाबाबतचं निवेदन सादर केलं. यावेळी फडणवीसांनी बारसू येथील आंदोलनावरून गंभीर आरोप केले.

बारसू आंदोलनासाठी बंगळुरूतून पैसा मिळाला आहे. बंगळुरूतून फंडिंग झालं आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केला. बारसू आंदोलनात तेच तेच लोक प्रत्येक आंदोलनात कसे दिसतात? असा सवाल देखील फडणवीस यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

बारसू रिफानरीला विरोध म्हणून विरोधकांनी केलेल्या आंदोलनावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "काही लोक ज्यांना या देशाचा विकास नको आहे, तिचं माणसं आपल्याला आरेच्या आंदोलनात, बुलेट ट्रेनच्या आंदोलनात, तीच माणसं बारसूच्या आंदोलनात आणि यातील काही माणसं नर्मदेच्या आंदोलनात देखील होती"

"माझा सवाल आहे की, आपण जर यांचा रेकॉर्ड ट्रेस केला तर वारंवार ही माणसं बंगळुरुला जातात यांच्या अकाऊंटमध्ये तिथून पैसे येतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रीनपीस ज्या संघटना आहे त्यावर आपल्याकडं बंदी घातलेली आहे. त्याचे जे माजी सदस्य आहेत. त्यांच्या संपर्कात हे लोक असतात. त्यामुळं हे फक्त गावकऱ्यांपुरतं मर्यादित नाही", असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

दरम्यान, पोलिसांनी बारसू आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, "बारसू आंदोलनात ताब्यात घेतलेल्या नागरिकांना पोलिसांच्याच गाडीत बसवून त्यांच्या घरी सोडण्यात आलं. कोर्टात गेल्यानंतर कुठल्याही तक्रारदारानं मारहाण केल्याची आणि चुकीची वागणूक दिल्याची तक्रार केलेली नाही. त्यामुळं यावर होणारे आरोप योग्य नाहीत", असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

SCROLL FOR NEXT