Devendra Fadnavis Saam tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis: तुम्ही वाघाचे फोटो काढत होता, तेव्हा कारसेवक अयोध्येत लाठ्या खात होते; फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: 'तुम्ही वाघाचे फोटो काढत होता, तेव्हा कारसेवक अयोध्येत पोलिसांच्या लाठ्या खात होते. तर काही गोळ्या खात होते, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे.

Vishal Gangurde

आवेश तांदळे, मुंबई

Devendra Fadnavis Latest News:

राम मंदिराचा लोकार्पणाचा सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सोहळ्याआधीच देशासहित राज्याचं राजकारण देखील तापू लागलं आहे. या राम मंदिरावरूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. 'तुम्ही वाघाचे फोटो काढत होता, तेव्हा कारसेवक अयोध्येत पोलिसांच्या लाठ्या खात होते. तर काही गोळ्या खात होते, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. (Latest Marathi News)

ठाण्यातील आनंदनगर परिसरातील ठाणे महापालिका मैदानात परिसरात राम कथा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात राम मंदिरावरुन देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर सडकून टीका केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मला खूप आनंद झाला, तुमचे दर्शन घेण्यासाठी इथे आलो आहे. आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की, राम मंदीर होत आहे. बाबरने आपले राम मंदिर पाडले आणि बाबरी मशीद बांधली. सगळ्या लोकांना ही मशीद टोचत होती. शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापना केली. त्यामुळे पुन्हा एकदा स्वाभिमान निर्माण झाला. बाबरीचा ढाचा आपल्याला टोचत होता. 6 डिसेंबरला या मशिदीचा ढाचा पडला आणि छोटे राम मंदिर बांधण्यात आलं'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फडणवीसांची काँग्रेसवर टीका

'मला आता आनंद होतो की, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भव्य राम मंदिर 22 जानेवारीला स्थापना होणार आहे. काही लोकांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. ज्यांनी सुप्रीम कोर्टात रामाच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण उपस्थित केले, असं म्हणत फडणवीसांनी काँगेसवर टीका केली.

तुम्ही वाघाचे फोटो काढत होते : फडणवीस

यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली. 'काल त्यांनी विचारलं फडणवीस कारसेवक होते का? हो, मी वीस वर्षाचा होतो, त्यावेळी कारसेवक होतो. तुमचे तर वय होते, त्यावेळी तुम्ही वाघाचे फोटो काढत होते. खरे कारसेवक तर अयोध्येत लाठ्या खात होते. बंदुकीच्या गोळ्या खात होते. उद्धव ठाकरे तुमचा एक नेता दाखवा, जो अयोध्येत कारसेवक होता? आम्ही होतो, लालकृष्ण अडवाणी होते'.

देवेंद्र फडणवीसांची जितेंद्र आव्हाडांवर टीका

'उद्धव ठाकरे म्हणाले होते की, माझ्या वजनाने बाबरी पडली असती. खरंतर आम्हाला त्यांना हिंदुत्व सांगण्याची गरज नाही. ज्या लोकांनी राम मंदिर विरोध केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. ठाण्यातील एक जण बोलत होते की, राम काय खात होते, त्यावर बोलत होते. त्यांना एवढंच सांगतो की, राम काही खाऊ द्या, तुम्ही मात्र शेण खात आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: नवरा बायकोचं लग्नानंतर बोलणं कमी झालंय? 'या' टिप्स करा फॉलो, नातं होईल घट्ट

Bhakri Making Tips : भाकरी थापताना तुटते? टेन्शन घेऊ नका, फक्त 'या' सोप्या टिप्स वापरा

लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट, 2100 नाहीतर 4500 मिळणार|VIDEO

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये EVM आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयडी कार्ड, शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

Anushka Sharma Looks Like: 'वहिनीपेक्षा ही क्युट...'; पाकिस्तानी तरुणी दिसते सेम अनुष्कासारखी, व्हिडिओ पाहून विराटला केलं टॅग

SCROLL FOR NEXT