Devendra Fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis: मलिकांचा राजीनामा न घेणे म्हणजे, एका विशिष्ट समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न - फडणवीस

देशद्रोह्यांसोबत व्यवहार केल्यानंतर अशा गुन्ह्यातील व्यक्तीला वाचवायचा प्रयत्न हा अतिशय दुर्दैवी आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई: मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा न घेणे म्हणजे एका विशिष्ट समाजला सिग्नल देण्याचा प्रयत्न आहे, अशी जळजळीत टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. मलिकांनी देशद्रोह्यांसोबत व्यवहार केल्यानंतर अशा गुन्ह्यातील व्यक्तीला वाचवायचा प्रयत्न हा अतिशय दुर्दैवी आहे, असंही ते म्हणाले (Devendra Fadnavis Criticize Mahavikas Aghadi Says We Will Raise Voice For Nawab Maliks Resignation).

भाजप नेत्यांची बैठक

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) सत्ताधाऱ्यांना कुठल्या मुद्यावरुन घेरायचं, कुठले मुद्दे लावून धरायचे याची रणनिती आखण्यासाठी आज भाजपची (BJP) एक महत्त्वाची बैठक पार पडली. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्त्वात ही बैठक पार पडली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्यांवरुन महाविकास सरकारवर ताशेरे ओढले. यावेळी त्यांनी नवाब मलिकांच्या राजीनामा प्रकरणावरही भाष्य केलं.

नवाब मलिक यांना वाचवायला सरकार उभं - फडणवीस

देशाच्या इतिहासात जे घडलं नाही ते राज्यात पहायला मिळत आहे. दाऊद इब्राहिमचे सहकारी यांच्यासोबत व्यवहार करुन जेलमध्ये मंत्री गेले. नवाब मलिक (Nawab Malik) यांना वाचवायला सरकार उभं राहिलं आहे. देशात असं कधी कधीच घडलं नाही. पोलीस कोठडीत गेल्यानंतर मंत्री पदावर कायम आहे. हे सरकार अवमान करत आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला पाहिजे. यासाठी आम्ही सभागृहात संघर्ष करु, असं फडणवीस म्हणाले.

नवाब मलिकांचा राजीनामा न घेऊन हे सरकार असं दाखवू इच्छितं की एका विशिष्ट समाजाला सिग्नल देण्याचा हा प्रयत्न आहे. संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा राजीनामा लगेच घेतला जातो. पण, मलिकांनी देशद्रोह्यांसोबत व्यवहार केल्यानंतर अशा गुन्ह्यातील व्यक्तीला वाचवायचा प्रयत्न हा अतिशय दुर्दैवी आहे, अशी खरमरीत टीका फडणवीसांनी केली.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT