Fadnavis on OBC Reservation Saam TV
मुंबई/पुणे

OBC Reservation: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची बेअब्रू झालीये, फडणवीसांचा घणाघात

राज्य सरकारचे धिंडवडे निघाले आहेत, असा घणाघात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

Nupur Chilkulwar

सुशांत सावंत

मुंबई: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची बेअब्रू झाली आहे. राज्य सरकारचे धिंडवडे निघाले आहेत, असा घणाघात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राज्य सरकारला पुन्हा एकदा झटका दिलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) दाखल केलेला अहवाल प्रायोगिक अभ्यास आणि संशोधनाशिवाय तयार करण्यात आला आहे असे नमूद करीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फेटाळला आहे. त्यावर आता फडणवीसांनी राज्यसरकारवर सडकून टीका केलीये (Devendra Fadnavis Criticize Mahavikas Aghadi Government Over OBC Reservation).

राज्य सरकारचे धिंडवडे निघाले - देवेंद्र फडणवीस

"ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावर राज्य सरकारची बेअब्रू झाली आहे. हा कुठला डेटा तुम्ही कट पेस्ट करुन लावला. राज्य सरकारचे धिंडवडे निघाले आहेत. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही वेळ आलीये", असा घणाघात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलाय.

"अंतरिम अहवालाच्या नावावर सरकार आणि आयोग म्हणते आम्ही डेटा जमा केला नाही. थट्टा करण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकारचा अहवाल देऊन काय मिळणार आहे. इतके दिवस देऊन अहवाल का तयार केला नाही हे कोर्टाने विचारले. सांगली जिल्ह्यातल्या 10 ग्रामपंचायतींनी आपला डेटा पाच ते सात दिवसात दिला. राज्य सरकारला हे सहज शक्य आहे. आपला नाकर्तेपणा लपवायचा कार्यक्रम सुरू आहे".

"ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये. पालिका निवडणुका बिलकुल घेऊ नये. जर निवडणुका झाल्या तर ओबीसींचे नुकसान होईल. ओबीसी निर्णय होईपर्यंत निवडणुका घेऊ नये".

"विकास गवळी कोण हे यापूर्वी मी सागितले आहे. भुजबळ साहेबांनी नाना पटोले (Nana Patole) यांना विचारला पाहिजे. दुसरे याचिकाकर्ते डॉगरे यांना नाना पटोले यांनी तिकीट दिलं आहे", असं म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

"पालिकेत भ्रष्टाचाराचा बापही लाजेल, असे चित्र आहे. खाली डोके वर पाय करणाऱ्या आमदारांचे मी स्वागत करतो. कारण, त्यांनी त्यांच्या सरकारचे खरं रुप दाखवले. राज्यपालांचा अवमान करणारे हे सरकार आहे. राज्यपाल राज्यातले नाहीत. ते हिंदीत बोलतात. जाणीव पूर्वक वाद निर्माण हे सरकार करत आहे", असंही ते म्हणाले.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो ? यावर उपाय काय ?

When to do heart checkup: भारतातील 30% मृत्यू हार्ट अटॅकमुळेच! धोका टाळण्यासाठी कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आणि कधी?

Vice President Election : उपराष्ट्रपतींची निवडणूक कशी होते? नेमकी प्रक्रिया काय असते? जाणून घ्या सविस्तर

UPI Payment: आता पिनशिवाय होणार UPI पेमेंट, फक्त तुमच्या फेस लॉकने

Snake Bite: साप चावल्यावर लगेच काय करावे?

SCROLL FOR NEXT