Pune Metro News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Metro News : पुणेकरांसाठी खुशखबर! मेट्रो टप्पा-2 ला हिरवा कंदील, उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Pune Metro News : पुणे मेट्रो टप्पा-2 अंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि सासवड रोड या दोन उपमार्गिकांना मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा समितीने मान्यता दिली आहे. ५७०४ कोटींच्या या प्रकल्पामुळे पूर्व पुणे आणि ग्रामीण भागांना मेट्रो सेवा उपलब्ध होणार आहे.

Alisha Khedekar

पुणे मेट्रो टप्पा-2 अंतर्गत दोन नवीन उपमार्गिकांना मंत्रीमंडळाने मान्यता दिली

हडपसर-लोणी काळभोर आणि सासवड रोड मेट्रो मार्गांना हिरवा कंदील

५७०४ कोटींचा प्रकल्प, १६ कि.मी. लांबी आणि १४ उन्नत स्थानके प्रस्तावित

पूर्व पुणे आणि ग्रामीण भागातील प्रवाशांचा प्रवास जलद

पुणेकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. पुणे मेट्रो टप्पा- 2 खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीस आज मंजुरी मिळाली आहे

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. पुणे मेट्रो टप्पा- 2 खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन महत्त्वाच्या मेट्रो रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन उपमार्गिका एकूण १६ किलोमीटर लांबीच्या असून त्यामध्ये एकूण १४ उन्नत स्थानकांचा समावेश असेल. या दोन्ही उपमार्गिकांसाठी ५ हजार ७०४ कोटी रुपये खर्च येणार असून या पूर्णतः उन्नत मेट्रो प्रकल्पांची महा मेट्रोमार्फत अंमलबजावणी करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच पुणे मेट्रोचे जाळे पूर्वेकडे विस्तारित होणार असून पूर्व पुणे आणि परिसरातील ग्रामीण भागालाही मेट्रो सेवेचा लाभ मिळेल. लाखो प्रवाशांना जलद आणि सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केला आहे.

पुणे मेट्रो टप्पा-2 अंतर्गत होणाऱ्या या दोन उपमार्गिकांमुळे हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर आणि सासवडसारख्या वाढत्या उपनगरांना मेट्रो जोडणी मिळेल. या मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि प्रदुषण कमी होण्यास मदत होईल, अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Marathi Singer Death: ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड; सुगम संगीताचा सुवर्णपर्व संपला, संगीत विश्वावर शोककळा

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Pulao vs Biryani: पुलाव आणि बिर्याणीमध्ये काय फरक असतो?

Moringa Leaves Benefits: शरीराची शक्ती वाढवतात 'ही' औषधी पाने, दररोज अशाप्रकारे खाल्ल्यास होईल फायदा

18th Newsmakers Achievers Awards 2026: मुंबईत विविध क्षेत्रांतील उत्कृष्टतेचा गौरव

SCROLL FOR NEXT